वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, भरमसाठ वाढलेली वाहने, लोकसंख्या वाढ यांमुळे पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ध्वनी प्रदूषणाची समस्यासुध्दा यामुळेच झाली आहे. ध्वनी प्रदूषणाचे विपरीत परीणाम मानव व इतर प्राण्यांच्या आरोग्यावर होत असतात. यासाठी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आज गरजेचे बनलेले आहे. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी काही उद्दिष्टे ठरवावी लागतील. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उद्दिष्टे योजवित याविषयी माहिती खाली दिली आहे.

ध्वनी प्रदूषणाची उद्दिष्टे –

ध्वनी प्रदूषण कमी करणे हेच या समस्येचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसे पाहिले तर, ध्वनी प्रदुषण रोखणे हे इतर अन्य प्रदूषण समस्यांच्या मानाने खूपच सोपे आहे. कारण मानवनिर्मित गाड्या, कारखाने, मशिनरी, फटाके या कारणांमुळे ध्वनी प्रदुषण होत असते. अशावेळी ही कारणेचं रोखल्यास किंवा त्यामध्ये योग्य बदल करून त्यांचा आवाज नियंत्रित केल्यास बऱ्याच प्रमाणात ध्वनी प्रदुषण आटोक्यात आणणे सहज शक्य आहे.

ध्वनी प्रदुषण नियंत्रीत करण्यासाठी उद्दिष्टे :

उद्दीष्ट क्रमांक 1 –

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे उद्दिष्ट –

वाहन, कारखाने, मशिनरी याद्वारे यांच्या आवाजातून ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असते. अशावेळी प्रगत तंत्रज्ञान वापरून वाहने, कारखाने, मशिनरी यांच्यातून अत्यंत कमी आवाज होईल याची काळजी घ्यावी. आवाज कमी करणाऱ्या ह्या तंत्रज्ञानास Active-noise-control (ANC technology) असे म्हणतात. ANC तंत्रज्ञानाचा वापर मोठ्याप्रमाणात करून कमी आवाज करणारी वाहने, मशिनरी यांची निर्मिती केली पाहिजे.

उद्दीष्ट क्रमांक 2 –

ट्रॅफिक समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट –

ट्रॅफिकच्या समस्येमुळे मोठमोठ्या शहरात ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर रूप घेत असते. रोडवरील भरमसाठ कार, दुचाकी, मालवाहतूक गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर अशा सर्वच वाहतुकीच्या साधनांचे इंजिनाचे आवाज, हॉर्न यामुळे रोडवर ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात झालेले आढळते. अशावेळी रोडवरील हे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ट्रॅफिक समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट योजावे लागेल.

यासाठी वाहनांमध्ये आवाज करणाऱ्या ANC तंत्रज्ञानाचा वापर मोठ्याप्रमाणात करावा लागेल. त्याचबरोबर अत्याधुनिक वाहने वापरली पाहिजेत. इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचा वापर वाढणे आवश्यक आहे. कारण अशा गाड्यांच्या इंजिनमधून नगण्य किंवा अत्यंत कमी आवाज होत असतो. इलेक्ट्रिक कारमधून होणारा आवाज हा नेहमीच्या internal combustion engine च्या पेट्रोकेमिकल कारमधून होणाऱ्या आवाजापेक्षा 6 dB पेक्षा कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारचा वापर वाढल्यास ध्वनी प्रदुषण (..आणि वायू प्रदूषणही) मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जुन्या रेल्वेगाड्यापेक्षा अत्याधुनिक अशा हाय स्पीड ट्रेनचा वापर वाढवावा लागेल.

उद्दीष्ट क्रमांक 3 –

सामुदायिक गोंगाट कमी करण्याचे उद्दिष्ट –

भारत देशात धर्म, जात, पंथ यामध्ये विविधता आढळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या संस्कृती, परंपरा यामध्येही वैविध्य आहे. आपल्या देशात अनेक सण, समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आपल्या देशात तर मिरवणुका, निवडणुकांची भाषणे यांचा बारमाही हंगाम असतो. अशावेळी सर्वचजण उत्साहाच्या भरात ‘जाहीर प्रदर्शन’ करण्यासाठी फटाके, ढोलताशे, डॉल्बी, लाऊडस्पिकर यांचा वापर करतात. मात्र अशा कारणामुळे ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असते.

फटाके, डॉल्बी सारख्या साधनांनी तुमचे कार्यक्रम जरूर ‘जल्लोषात साजरे’ होत असतील, मात्र आपल्या या कृतीमुळे आपण इतर आजारी लोक, लहान बालके, पशू-पक्षी यांच्या जीवाशी खेळत आहोत याचे भान गोंगाटास हातभार लावणाऱ्या प्रत्येकाने ठेवले पाहिजे. त्यामुळे समाजाने स्वतःला ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी काही निर्बंध घालून घेतले पाहिजेत. सामुदायिक गोंगाट कमी करण्याचे खूप मोठे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. कारण अशा बाबींमध्ये विरोध केल्यास लोकं किंवा समाज आक्रमक पवित्रा घेत असतात.

उद्दीष्ट क्रमांक 4 –

जनजागृती करण्याचे उद्दिष्ट –

जोपर्यंत लोकांना स्वतःहून ध्वनी प्रदूषणाचे तोटे समजणार नाहीत तोपर्यंत ही समस्या रोखणे कठीण आहे. ध्वनी प्रदुषण ही पर्यावरणीय समस्या निर्माण होण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मनावर घेतल्यास, प्रत्येकाने ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केल्यास ही समस्या लवकर दूर होणे सहज शक्य आहे. यासाठी समाजामध्ये ध्वनी प्रदुषण व त्याच्या वाईट परिणामांची जनजागृती व्यापक प्रमाणात करण्याचे उ्दीष्ट आपल्यापुढे असेल.

जल प्रदूषण विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

उद्दीष्ट क्रमांक 5 –

कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट –

ध्वनी प्रदूषणाचे मानव व पशूपक्षांच्या आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन भारत सरकारने 2000 साली ध्‍वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत.

या कायद्याच्या उल्‍लंघनासाठी एक लाख रुपायापर्यंत दंड किंवा पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड आणि तुरुंगवास दोन्हीही अशा विविध शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ध्‍वनी प्रदूषण रोखण्यासाठी जर या कायद्याची अमलबजावणी काटेकोरपणे केल्यास ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. मात्र आपल्या यंत्रणेलाचं ध्वनी प्रदूषणाचे गांभीर्य नसल्याने सध्यातरी ध्‍वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

हे सुद्धा वाचा..

Information about Noise pollution aims & objectives in Marathi language.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...