नागीण आजार – Herpes zoster :
नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या (chickenpox) आजार होत असतो.
नागीण रोग कशामुळे होतो? Causes of Nagin rog :
नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना कांजिण्या झालेला असतो त्यांच्या शरीरात मज्जारज्जूमध्ये कांजिण्याचा विषाणू लपून बसलेले असतात. आणि जेंव्हा केंव्हा त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी होते तेव्हा हे लपलेले विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर प्रचंड वेदना असणारे पुरळ निर्माण करतात त्याला नागीण होणे असे म्हणतात.
नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते. या विषाणूची एका किंवा दोन-तीन नसांनाही याची लागण होऊ शकते. नागीण शरीवरील कोणत्याही भागावर होऊ शकतो. काहीवेळा नागीण डोळ्यांमध्येही होऊ शकते. डोळ्यांमध्ये नागीण झाल्यास परिणामी अंधत्वही येऊ शकते.
नागीण आजाराची लक्षणे – Nagin Disease Symptoms :
- नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होतात. त्याठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवितात.
- तेथील त्वचेची आग होते.
- दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके येतात व त्यानंतर त्यात पाणी धरते.
- पाच ते सहा दिवसात खपल्या धरतात व फोडही जातात. फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.
नागीण बरी झाल्यावरही काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात अधूनमधून वेदना होणे, चमक मारणे असा त्रास होऊ शकतो.
नागीण आजारावरील उपचार माहिती – Nagin Disease treatment :
नागीण झाल्यावर लगेच उपचार सुरू करावेत त्यामुळे याचा त्रास लवकर कमी होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. यासाठी आपले डॉक्टर अँटीव्हायरल (antiviral medicine) आणि वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे देतील. नागीण हा काही जीवघेणा असा आजार नाही. साधारण दोन ते सहा आठवड्यात नागीण आजार बरा होतो.
नागीण आजारावरील घरगुती उपाय :
- पुरळ आलेला भाग थंड पाण्याने धुवावा किंवा थंड पाण्याने तो भाग पुसून घ्यावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. याशिवाय थंडगार शेक घेणेसुद्धा उपयुक्त ठरते.
- बेकिंग सोडामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करून ती पुरळ आलेल्या ठिकाणी लावावी. यामुळेही नागिणीच्या वेदना कमी होतात.
- नागीण झाल्यास त्याठिकाणी क्रीम किंवा लोशन लावणेही फायदेशीर असते. विशेषतः capsaicin हा घटक असणारी क्रीम किंवा लोशन वापरावी. यामुळे सूज व वेदना कमी होते.
नागीण आजार झाल्यास ही घ्यावी काळजी –
- हलका आहार घ्यावा. नागीण झाल्यास कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या..
- पुरेशी विश्रांती घ्यावी.
- नागीण असलेल्या ठिकाणी खाजवू नका.
- अंघोळीनंतर ती जागा पुसून घ्यावी.
- नागीण झालेल्या रुग्णाचे कपडे, साबण इ. वैयक्तिक वापराच्या वस्तू दुसऱ्यांनी वापरू नयेत.
- गरोदर स्त्री, लहान बालके आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी नागीण झालेल्या रुग्णांचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा.
- घरगुती उपाय करत बसू नका.
- डॉक्टरांकडून नागीण झाल्यावर लगेच उपचार करून घ्या.
मुख्य म्हणजे नागीण ह्या आजारावर असलेल्या गैरसमजांवर विश्वास ठेऊ नका. जसे नागिणीचे दोन टोके मिळाल्यास किंवा नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका होतो. ह्या सर्व गैरसमजुती आहेत. नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते त्यामुळे दोन टोके जुळण्याचा, विळखा घेण्याचा प्रश्नचं येत नाही.
नागीण रोग संसर्गजन्य आजार आहे का..?
नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या आजार होत असतो. त्यामुळे एकाद्या व्यक्तीला नागीण झाल्यास त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला झाल्यास त्याला कांजिण्या (chickenpox) हा आजार होऊ शकतो.
कांजिण्या आजार झाल्यानंतर varicella-zoster हे व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात nerve tissue मध्ये छुप्या स्वरूपात राहतात. आणि जेव्हा त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी होते तेंव्हा त्या व्हायरसमुळे नागीण आजार होत असतो.
नागीण व कांजिण्या आजारास कारणीभूत असणारे varicella-zoster हे व्हायरस प्रामुख्याने त्वचेवर आलेल्या पुरळांच्या स्त्रावातून पसरत असतात. जर तुम्हाला लहानपणी कधीही कांजिण्या न झालेला असल्यास व तुमचा संपर्क नागीण किंवा कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवरील पुरळांच्या स्त्रावाशी आल्यास तुमच्या शरीरात varicella-zoster हे व्हायरस पसरतात व कांजिण्या आजार निर्माण करतात. त्यानंतर पुढील काही वर्षात रोग प्रतिकारशक्ती शक्ती कमी झाल्यावर नागीण आजार होतो.
जर लहानपणी कांजिण्या झालेला असल्यास शरीरात या व्हायरसच्या अँटीबॉडीज तयार झाल्याने पुन्हा नव्याने या व्हायरसचा संसर्ग होत नाही. अशा व्यक्तींमध्ये व्हायरस आधीपासूनच शरीरात छुप्या स्वरूपात लपलेले असतात. आणि कालांतराने त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी झाल्यावर नागीण आजाराचा त्रास त्याला होत असतो.
हे सुद्धा वाचा – नागीण झाल्यास कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या..
Herpes zoster, also known as shingles or Nagin disease, is caused by reactivation of varicella-zoster virus. Article about Nagin rog causes, symptoms, home remedies & treatment. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on May 24, 2024.
Very good information
Thanks
Thanks for your feedback
Thanks
Thanks for your feedback