लघवीतून रक्त येणे –

काहीवेळा लघवीतून रक्त पडल्याचे दिसते. वैद्यकीय भाषेत याला हेमॅटुरिया (Hematuria) असे म्हणतात. लघवीतून रक्त जाणे याची अनेक कारणे असू शकतात. काही कारणे ही सामान्य तर काही कारणे गंभीर सुद्धा असू शकतात. त्यामुळे लघवीतून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

लघवीतून रक्त येण्याची कारणे –

  • मूत्रमार्गात दुखापत झाल्याने लघवीतून रक्त येऊ शकते.
  • तसेच मूतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे अशा कारणांनी लघवीतून रक्त येऊ शकते.
  • एस्पिरिन आणि पेनिसिलिन यांसारख्या औषधांमुळेही लघवीतून रक्त येऊ शकते.
  • काहीवेळा किडनीचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर अशा गंभीर कारणांमुळे देखील लघवीतून रक्त येऊ शकते.

लघवीतून रक्त पडणे याची लक्षणे –

लघवीतून रक्त जाणे हे याचे प्रमुख लक्षण असते. याशिवाय जर किडनी स्टोन मुळे लघवीतून रक्त जात असेल तर यावेळी ओटीपोटात अतिशय वेदना होणे, पाठीत दुखणे, लघवी करताना दुखणे आणि मळमळ होणे अशी अन्य लक्षणे देखील असतात.

तेच जर मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्याने लघवीतून रक्त जात असेल तर यावेळी लघवीला जळजळ होणे, वारंवार लघवीला झाल्यासारखे वाटणे, लघवी करताना दुखणे यासारखी लक्षणे जाणवू लागतात.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
लघवी करताना रक्त येत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण काहीवेळा लघवीतून रक्त पडणे हे इतर गंभीर समस्यांशी संबंधित असू शकते. यासाठी याचे वेळेवर निदान आणि उपचार होणे गरजेचे असते.

लघवीतून रक्त येणे याचे निदान –

लघवीतून रक्त कशामुळे जात आहे ते तपासण्यासाठी युरीन टेस्ट केली जाते. याशिवाय सिस्टोस्कोपी, किडनी इमेजिंग तपासणी, अल्ट्रासाऊंड यासारख्या तपासण्या देखील कराव्या लागू शकतात.

लघवीतून रक्त येणे यावरील उपचार –

कोणत्या कारणांमुळे लघवीतून रक्त जात आहे, त्या
कारणावर उपचार अवलंबून असतात. जसे जर मूत्रमार्गात इन्फेक्शन झाले असल्यास, त्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स औषधे देतील. आणि जर मुतखडा असल्यास, त्यासाठी औषधे किंवा शस्त्रक्रिया याद्वारे उपचार केले जातात.

हे सुध्दा वाचा – लघवीला जळजळ होणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Blood in Urine (Hematuria) Causes, Symptoms and Treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *