संडासला कडक होणे –
बऱ्याचजणांना संडासला कडक होण्याची समस्या असते. यामुळे संडासला खडा झाल्याने शौचावेळी त्रास होत असतो. अयोग्य खानपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या वेळा न पाळणे अशी कारणे यासाठी जबाबदार असतात.

संडास पातळ होण्यासाठी घरगुती उपाय –
संडास पातळ होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. यामुळे सकाळी संडास साफ होण्यास मदत होते.

रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडेल तेल खाल्ल्यास संडास पातळ होण्यासाठी मदत होते.

संडास पातळ होण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून त्यात चमचाभर एरंडेल तेल घालून प्यावे. हे उपाय पातळ संडास होण्यासाठी उपयोगी पडतात.

संडास पातळ होण्यासाठी काय करावे..?

  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
  • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
  • पचायला जड असणारे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ खाणे कमी करावे.
  • बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा.

अशी काळजी घेतल्यास रोजच्या रोज संडासला साफ होण्यासाठी मदत होते.

हे सुध्दा वाचा – पोटात गॅस होणे यावरील उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Soften Hard Stools Home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *