Dr Satish Upalkar’s article about Jaundice diet plan in Marathi language.
कावीळ आणि आहार पथ्य :
कावीळ हा लिव्हरचा एक आजार असून यामध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. काविळ झाल्यावर काही दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या आजारात औषध उपचारांबरोबरच आहार पथ्य सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे असते. कावीळ आजाराची माहिती जाणून घ्या..
कावीळ झालेल्या रुग्णानी किमान पंधरा दिवस ते महिनाभर योग्य आहार आणि विश्रांती घेण्याची गरज असते. यासाठी या लेखात कावीळ झालेल्या रुग्णांसाठी आहार पथ्य कसे असावे, कावीळ झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती दिली आहे.
कावीळ झाल्यावर काय खावे ..?
कावीळ झाल्यास काही दिवस पचनास हलका आहार घ्यावा. तसेच भाज्यांचे सूप, ताजी फळे, फळांचा ताजा रस, उसाचा रस यांचा आहारात समावेश असावा. कावीळ रुग्णांनी तेलकट, तिखट व मसालेदार पदार्थ, बाहेरचे उघड्यावरील दूषित पदार्थ खाऊ नये.
1) कावीळ झाल्यास हलका आहार घ्यावा.
काविळ झालेल्या रुग्णांनी पचायला हलका असणारा आहार घ्यावा. आजारपणामुळे भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते यासाठी सहज पचणारा, फायबर्सयुक्त आहार घ्यावा. यासाठी आहारामध्ये वरणभात, लाह्या, नाचणी, राजगिरा, ओट्स ही धान्ये, मुगडाळ, मसाला न घातलेली भाजी, भाज्यांचे सूप, चाकवत भाजी, ताजी फळे, काळ्या मनुका, गोड ताक असा पचायला हलका असणारा आहार कावीळ झाल्यास घ्यावा.
2) कावीळ झाल्यावर विविध फळे खावीत.
कावीळमध्ये ऊसाचा रस, संत्री, अननस, पपई, द्राक्षे, डाळिंब, आंबा ही फळे, विविध फळांचा ताजा रस प्यावा, मधाचे चाटण करावे कारण यातून मिळणार्या digestive enzymes मुळे काविळ होण्यास जबाबदार असणाऱ्या बिलीरुबिन या घटकाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
3) उकळवून थंड केलेले पाणी प्यावे.
कावीळ ही दूषित पाण्यातून होत असते त्यामुळे कावीळ झाल्यास पाणी उकळवून थंड करून प्यावे. असे करण्याने दूषित पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील. तसेच दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे रक्तसंचारण व्यवस्थित होऊन यकृतातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होईल.
कावीळ मध्ये काय खावे याची माहिती सोप्या व्हिडिओतून जाणून घ्या..
कावीळ झाल्यावर काय खाऊ नये ..?
मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, मांसाहार, मासे, जास्त तिखट-खारट पदार्थ, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. फास्टफूड, स्नॅक्स, लोणची, पापड, बटाटेवडा, भजी, चॉकलेट्स, चिवडा, बेकरी पदार्थ, चरबीजन्य पदार्थ खाऊ नये. तसेच चहा, कॉफी, विविध कोल्ड्रिंक्स (शीतपेय) पिऊ नयेत.
1) मांसाहार खाणे टाळावे.
काविळ झाल्यास मटण, मांस, मासे, अंडी, चिकन खाणे टाळावे. कारण मांसाहार पचनास जड असतो यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असून ते यकृताच्या आरोग्यासाठी चांगले नसते.
2) दूषित अन्न खाऊ नये.
बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. दूषित पाणी, माशा बसलेले दूषित अन्न, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.
3) कावीळ रुग्णाने व्यसनांपासून दूर राहावे.
कावीळ झाल्यास दारू, अल्कोहोल, सिगारेट, धूम्रपान यासारखी व्यसने करू नये. कारण यांमुळे यकृताची (लिव्हरची) भरपूर प्रमाणात हानी होत असते. दारू पिणार्यांनी किमान सहा महिने दारू बंद केली पाहिजे. दारू ही यकृताला अत्यंत घातक आहे. अशाप्रकारे काविळीच्या रुग्णांनी योग्य औषधोपचार आणि पथ्य पाळले तर हा आजार लवकर बरा होतो.
खालील लेख सुद्धा वाचा :
कावीळ आजाराची लक्षणे व उपचार याची माहिती जाणून घ्या..
In this article information about the Jaundice diet chart in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).