त्रास मुतखड्याचा..
मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास अनेकांना असतो. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. याठिकाणी मुतखडा झाल्यावर काय त्रास होतो व त्यावर काय करावे याविषयी माहिती दिली आहे.
मुतखडा झाल्यावर काय त्रास होतो :
लहान आकाराचे मुतखडे फारसा त्रास न होता लघवीवाटे पडूनही जातात, परंतु जर किडनी स्टोनचा आकार आकार मोठा असल्यास ते मूत्रमार्गात अडथळा आणू लागतात. त्यामुळे पोटात असह्य वेदना होत असतात.
तसेच किडनीतील खडे लघवीबरोबर युरेटर मधून मुत्राशयात येत असतात त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
याशिवाय मुतखड्यामध्ये खालील त्रास होत असतो.
• लघवी करताना जळजळ होणे,
• लघवी करताना त्रास होणे,
• थेंब थेंब लघवी होणे, काहीवेळा लघवीत रक्त येणे,
• तसेच मुतखड्यामुळे लघवी थुंबून राहिल्याने मळमळ व उलट्या होणे, ताप येणे यासारखा किडनी स्टोनमध्ये त्रास जाणवत असतो.
मुतखडा झाल्यावर काय करावे..?
• दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे लघवीवाटे मुतखडे निघून जाण्यास मदत होते.
• दररोज चमचाभर लिंबाच्या रसात एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे.
• दररोज तुळशीचा रस किंवा पाने चावून खल्यानेही किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
• सकाळी उपाशीपोटी कांद्याचा रस प्यावा. याच्या नियमित सेवनाने मुतखडे बारीक होऊन लघवीवाटे बाहेर पडतात.
• डाळींबाचा रस किंवा शहाळ्याचे पाणी पिणेही किडनी स्टोनवर उपयोगी असते.
Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.