गर्भावस्थेत छातीत धडधडणे :

गरोदर असताना पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषण देण्यासाठी आपले शरीर जास्त परिश्रम करत असते. गर्भावस्था जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्या बाळास पोषणाची आवश्यकता वाढत असते. बाळाचे पोषण आईच्या रक्ताद्वारे होत असते. त्यामुळे शरीरात रक्ताची मागणी वाढल्याने आपले हृदय जास्त रक्त पंप करण्यास सुरूवात करते. त्यामुळे हृदयाची धडधड वाढू लागते.

प्रेग्नन्सीमध्ये छातीत धडधड होण्याची कारणे :

बाळाला आणि आईला पर्याप्त मात्रेत रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी आईच्या शरीरात गरोदरपणात रक्ताचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे छातीत धडधड किंवा हार्टबीट वाढत असते.

तसेच हिमोग्लोबिनचयस कामात्रतेमुळेही छातीत धडधड वाढू शकते गर्भावस्थेत तणाव आणि भीतीमुळेही काहीवेळा छातीत धडधड होत असते. याशिवाय प्रोजेस्टेरोन हार्मोनमुळेही छातीत धडधड होत असते. गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती जाणून घ्या.

गरोदरपणात छातीत धडधड होणे यावरील उपाय :

  1. मानसिक ताण घेऊ नये.
  2. चहा, कॉफी, चॉकलेट यांचे प्रमाण कमी करावे.
  3. तिखट, मसालेदार किंवा जड पदार्थ खाण्याने गॅसेस, ऍसिडिटी सारख्या समस्या होऊन छातीत अस्वस्थ वाटून धडधड होऊ शकते. यासाठी रात्रीचा आहार हलका असावा.
  4. रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरण्यास जावे.
  5. गरोदरपणात दिलेल्या लोहाच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात.

Read Marathi language article about Heart palpitations during pregnancy. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.