गर्भावस्थेत अंगावरून पांढरे जाणे (Vaginal Discharge) :
गर्भवती होण्यापूर्वी जसे काहीवेळा अंगावरून पांढरे जात असते तसाच योनिस्त्राव गरोदरपणातही होऊ शकतो. अशाप्रकारे योनीतुन होणाऱ्या स्रावाला ल्यूकोरिया (leukorrhea) असे म्हणतात. योनीला साफ ठेवण्यासाठी या स्त्रावाचे महत्व असते.
गरोदरपणात जसजशी प्रसुती जवळ येईल तसे हा स्त्राव अधिक प्रमाणात येऊ शकतो. अशावेळी या पांढऱ्या स्त्रावात काही वेळा रक्तही मिसळलेले असू शकते.
गरोदरपणात अंगावरून पांढरट योनिस्त्राव जात असल्यास अशी घ्यावी काळजी :
• योनीमार्गातुन पांढरट स्त्राव होत असल्यास त्याठिकाणची स्वच्छता ठेवावी.
• सुती व स्वच्छ अंडरवेअर वापरावी.
• प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास असल्यास रोज वाटीभर दही खावे. दह्यात असणाऱ्या प्रोबायोटिकमुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते.
गरोदरपणात अंगावरून पांढरे जात असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
अंगावरून पांढरे जाणे ही एक सामान्य क्रिया असून त्यात फारसे काही काळजीचे कारण नसते. मात्र जर दुर्गंधीयुक्त व खाज सुटणारा स्त्राव येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण इन्फेक्शनमुळे असा त्रास येऊ शकतो.
White Vaginal Discharge During Pregnancy in Marathi information.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.