प्रसुतीमध्ये योनीमार्गात टाके पडणे (Episiotomy) :
नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गातून बाळ बाहेर येत असताना त्याठिकाणी जखम होऊ शकते. तसेच जर योनीमार्ग लहान असल्यास तेथे कात्रीने छेद (Episiotomy) देऊन मार्ग मोठा केला जातो. छेद देताना वेदना होऊ नये यासाठी तेवढा भाग लिग्नोकेन इंजेक्शनद्वारे बधीर केला जातो.
अशाप्रकारे योनी व गुदाच्या भागी जखम झाल्यास किंवा छेद द्यावा लागल्यास प्रसूतीच्या वेळी योनीमार्गात टाके घातले जातात. असे टाके पडले तरीही ती डिलिव्हरी ‘नॉर्मलचं’ मानली जाते. प्रसूतीची पहिलीचं वेळ असल्यास छेद देऊन योनीमार्ग रुंद करण्याची गरज भासत असते.
बाळंतपणानंतर योनीतील टाक्यांची काळजी अशी घ्यावी :
नॉर्मल डिलिव्हरीनंतर जेंव्हा तुम्ही हॉस्पिटलमधून घरी येता तेंव्हा योनीमार्गात टाके पडलेले असल्यास काही काळजी घेणे आवश्यक असते.
- टाके पडलेली जागा स्वच्छ राहील याची शौचाच्यावेळी काळजी घ्यावी.
- आपले पॅड नियमितपणे बदला.
- आंघोळ करताना पाण्यात थोडे एंटिसेप्टिक औषध मिसळून त्या पाण्याने ती जागा धुवून घ्यावी.
- टाके पडलेल्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तेथे एंटिसेप्टिक औषधे किंवा क्रीम लावावी.
- लघवी किंवा शौचाच्यावेळी टक्क्यांवर जास्त जोर देऊ नका.
- बद्धकोष्ठता किंवा मलाचा खडा धरत असल्यास व शौचास जास्त जोर लावावा लागत असल्यास डॉक्टरांकडून हलकी लैक्सेटिव औषधे घ्यावीत.
- मांडी रुंद करून किंवा मांडी लांब पसरून बसू नये.
- सुरवातीचे काही दिवस जड वस्तू उचलू नयेत.
- तसेच टाके पडले म्हणून सतत आरामही करू नये. चालणे, फिरणे सुरू करावे.
बहुतेक स्त्रियांचे टाके हे साधारण तीन ते चार आठवड्यात ठीक होऊन जातात. एक ते दोन महिन्यात त्याठिकाणी होणारी वेदनाही कमी होते.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक..?
टाक्यांच्या ठिकाणी वेदना व सूज होत असल्यास वेदनाशामक गोळी घेऊ शकता. जर त्याठिकाणी अधिक वेदना होत असल्यास, जखम चिघळली असल्यास किंवा तेथे पु धरत असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावेत. कारण अशावेळी त्याठिकाणी इन्फेक्शन झाल्याची शक्यता असू शकते.
एपिसिओटॉमीचे टाके पडलेले असल्यास संबंध कधी सुरू करू शकतो..?
जेंव्हा टाके पूर्ण बरे होतील तेंव्हा संबंध ठेऊ शकता. किंवा त्याठिकाणी वेदना व सूज नसल्यास प्रसूतीनंतर 6 आठवड्यानी संबंध सुरू करू शकता.
हे सुध्दा वाचा..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about episiotomy stitches in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.