Ear wax removal tips in Marathi.
कानातील मळ -Ear wax :
आपल्या कानामध्ये Ear wax तयार होत असतो. कानात Earwax तयार होणे हे नॉर्मल असून ते कानाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. Earwax किंवा कानातील मळ हा अँटीबॅक्टेरियल असून ते एक ल्युबरिकंट आहे.
कानात Ear wax तयार होणे ही नॉर्मल बाब असली तरीही कानातील स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कान साफ न केल्यामुळे कानात अधिक प्रमाणात मळ साचतो त्यामुळे कानात खाज येणे, कान गच्च वाटणे, ऐकू कमी येणे, कानात दुखणे, कानात आवाज होणे किंवा कानातून पाणी येणे अशा तक्रारीही होऊ शकतात. यासाठी कानातील मळ सोप्या पद्धतीने काढण्याचे उपाय खाली दिले आहेत.
कानातील मळ काढण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
खोबरेल तेल –
रात्री झोपताना मळ असणाऱ्या कानात कोमट केलेले खोबरेल तेल घालावे. यामुळे काही दिवसात मळ बाहेर येण्यास मदत होते.
तेल आणि लसूण –
मोहरी तेल किंवा ऑलिव्ह ऑईल यामध्ये थोडे लसूण टाकून गरम करावे. त्यानंतर हे तेल कोमट झाल्यावर कापसाच्या मदतीने कानात टाकावे. यामुळेही काही दिवसात कानातील मळ बाहेर निघण्यासाठी मदत होते.
कांद्याचा रस –
कांदा वाफेवर भाजून त्याचा रस काढावा. त्यानंतर कांद्याच्या रसाचे काही थेंब कापसाच्या मदतीने कानात टाकावे. यामुळेही कानातील मळ निघून जाण्यास मदत होते.
असा काढावा कानातील मळ :
पंचेंद्रियांपैकी कान हे एक महत्त्वाचे इंद्रिय असून यामुळे आपणास ऐकू येते. त्यामुळे कानाचे आरोग्य राखणे गरजेचे असते. मात्र अनेकजण कानात अधिक प्रमाणात खाज येत असल्यास किंवा कानात मळ झाल्यास टोकदार वस्तू, काड्या, कापसाच्या काड्या (इअर बड), हेयरपिन किंवा बोटं वैगरे घालत असतात.
असे करण्याने कानाच्या आतील पडद्याला दुखापत होण्याची भीती असते. त्यामुळे कानाचे आरोग्य धोक्यात येऊन कानाच्या अनेक तक्रारी उभ्या राहतात. यासाठी अधिक प्रमाणात कानात मळ असल्यास ENT स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. मळ निघण्यासाठी अनेक चांगले औषधी ड्रॉप्स उपलब्ध असून त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येईल.
कानात मळ असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
कानात मळ होण्याची समस्या सर्वांनाच कधींनाकधी होत असते. जर कानामध्ये जास्त मळ असल्यास किंवा कानात प्रचंड वेदना होत असल्यास, ऐकण्यामध्ये त्रास होत असल्यास किंवा कानामध्ये विशिष्ट आवाज होणे, घंटानाद (Tinnitus) होत असल्यास ENT स्पेशॅलिस्ट डॉक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते
कान दुखत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या..
In this article information about ear wax removal tips and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.