Tinnitus causes, symptoms and treatments in Marathi.
कानात आवाज ऐकू येणे – Tinnitus or Ringing in Ears :
काहीवेळा कानामध्ये घंटा वाजवल्यासारखे वेगवेगळे आवाज येऊ लागतात. या त्रासाला वैद्यकीय भाषेत टिनिटस (Tinnitus) असे म्हणतात. आयुर्वेदात या त्रासाला कर्ननाद असे म्हंटले आहे. एका किंवा दोन्ही कानात असा त्रास होऊ शकतो. सर्वच वयातील लोकांना हा त्रास कधिनाकधी होऊ शकतो, त्यातही उतारवयात कानात आवाज ऐकू येण्याचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. येथे कानात आवाज ऐकू येणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे.
कानात आवाज येण्याची कारणे –
कानात आवाज येणे याला अनेक कारणे जबाबदार असू शकतात. विशेषतः कानाचा पडदा फाटल्यामुळे किंवा कानाच्या आत असणारे लहानसे हाड खराब झाल्यामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय
- कानात ट्यूमर असल्यास त्याचा दाब auditory nerve वर पडल्यामुळे,
- कारखान्यासारख्या ठिकाणी सतत मोठ्या आवाजाखाली काम करणाऱ्या व्यक्ती,
- हेडफोनचा अतिवापर,
- वृद्धावस्थेत ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम झाल्याने कानात आवाज येतो,
- उच्च रक्तदाबाची समस्या असणे,
- रक्तात हाय कोलेस्टेरॉल असणे,
- डोक्याला मार लागणे,
- कानासंबधित मेनिअर आजारामुळे (Meniere’s disease) कानात आवाज येतो,
- कानात मळ अधिक असणे यामुळेही कानात आवाज ऐकू येण्याची समस्या निर्माण होते.
काही विशिष्ट औषधे घेण्यामुळे जसे, तापावरील Aspirin हे औषध, bumetanide सारखी मूत्रल औषधे, मलेरियाविरोधी chloroquine हे औषध, कॅन्सरवरील vincristine हे औषध किंवा erythromycin आणि gentamicin सारखी अँटी-बायोटिक्स अशी औषधे घेण्यामुळे कानात आवाज ऐकू येण्याचा त्रास होऊ शकतो.
टिनिटसची लक्षणे – Symptoms of tinnitus in Marathi :
कानामध्ये आतल्याआत घंटा किंवा शिटी वाजवल्यासारखे आवाज ऐकू येणे, अस्वस्थ व बैचेन वाटणे, चक्कर येणे, डोकेदुखी, झोपेच्या समस्या सुरू होणे असे त्रास व लक्षणे टिनिटस मध्ये जाणवतात.
कानात आवाज येतो याचे निदान – Diagnosing Tinnitus :
ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे ऐकण्याची क्षमता ऑडिओलॉजी परीक्षेद्वारे करतील. तसेच ते otoscope द्वारे कानाची तपासणी करू शकतात. याशिवाय त्रासाचे अधिक निदान स्पष्ट होण्यासाठी CT स्कॅन, MRI स्कॅन ह्यासारख्या तपासण्या कानात आवाज येत असल्यास कराव्या लागू शकतात.
कानात आवाज ऐकू येणे यावर उपचार – Treatment for Tinnitus in Marathi :
निदानातून कानात कशामुळे आवाज येत आहे याचे नेमके कारण लक्षात आल्यावर त्यानुसार यावर ENT स्पेशालिस्ट डॉक्टर उपचार ठरवतात. कानात आवाज ऐकू येणे यावर ते anti-depressants, anti-anxiety औषधांद्वारे उपचार करू शकतात. तसेच डिवाइस थेरेपीमध्ये मेडिकेटेड ईयरफोनद्वारे दिवसभरात काही काळ आरामदायी आवाज ऐकण्यासाठी सांगितले जाते. यामुळे कानाच्या आत होणारा कर्कश आवाज कमी होऊन आरामदायी आवाज ऐकू येऊन आराम मिळतो.
जर कानात मळ अधिक झाल्यामुळे हा त्रास होत असल्यास मळ बाहेर निघण्यासाठी ते काही Clearwax सारखे eardrops देतील. आणि जर काही विशिष्ट औषधे घेण्यामुळे हा त्रास होत असल्याचे दिसून आल्यास, ते औषधे बदलून घेण्यासाठी सांगतील. बाहेरील आवाज कमी ऐकण्यास येत असल्यास कानाचे मशीन दिले जाते. यासारखे उपचार कानात आवाज ऐकू येणे यावर केले जातात.
कानात आवाज ऐकू येणे यावरील उपाय :
- तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे 2 ते 3 थेंब कानात घालावे. तुळशीच्या पानांतील आयुर्वेदिक गुणधर्मामुळे कानात आवाज येणे कमी होण्यास मदत होते.
- कानात आवाज ऐकू येत असल्यास थोडे खोबरेल तेल कानात घालावे. कानात आवाज ऐकू येणे यावर हा उपयुक्त असा घरगुती उपाय आहे.
- तिळाच्या तेलात दोन लसुन बारीक करून टाकाव्यात. हे तेल थोडे गरम करून घ्यावे. कोमट झाल्यावर ह्या तेलाचे 2 ते 3 थेंब कानात घालावे.
- हळू आवाजात काहीवेळ आरामदायी संगीत ऐकत राहावे.
कानात आवाज ऐकू येणे यावर हे सर्व घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.
कानात आवाज येत असल्यास घ्यायची काळजी :
- कारखान्यासारख्या ठिकाणी सतत मोठ्या आवाजाखाली काम करणाऱ्या व्यक्तींनी कानाला इयरप्लग्स (Earplugs) घालून काम करावे.
- मानसिक ताण व तणावापासून दूर राहावे.
- नियमित व्यायाम करावा.
- मोकळ्या हवेत फिरायला जावे.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
- संतुलित आहार घ्यावा. आहारात भाज्या, फळे यांचा समावेश असावा.
- आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
- वारंवार चहा, कॉफी पिणे टाळावे.
- स्मोकींग, अल्कोहोल यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
कानात आवाज ऐकू येत असल्यास अशी काळजी घ्यावी.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा ..
- कान दुखणे यावरील उपचार
- कानात खाज येणे यावर उपाय
- कानातील मळ काढण्याचे उपाय
- कानातून पाणी येणे यावरील उपाय
Information about Tinnitus or Ringing in Ears causes, home remedy, treatment & prevention in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.