त्वचा कोरडी पडणे –
त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास अधिक होतो. सोरायसिसमुळे सुध्दा त्वचा कोरडी पडत असते.
त्वचा कोरडी पडण्याची कारणे –
हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसेच पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे त्वचा कोरडी पडते. केमिकल्स युक्त साबणाचा वापर करणे, जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे यामुळे देखील त्वचा कोरडी पडत असते. याशिवायसोरायसिस सारखे त्वचाविकार यामुळेही त्वचा कोरडी पडत असते.
त्वचा कोरडी पडणे यावरील घरगुती उपाय –
त्वचा कोरडी पडण्याची समस्या असल्यास त्वचेवर खोबरेल तेल किंवा बदाम तेल, जोजोबा ऑईल यापैकी कोणतेही तेल लावणे उपयुक्त असते. याशिवाय आपण मधाचाही वापर करू शकता. यामुळे त्वचेतील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
खोबरेल तेल –
त्वचा कोरडी पडत असल्यास त्वचेला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे. यामुळे आपली त्वचा मऊ, मुलायम आणि तजलेदार बनते. चेहरा कोरडा पडत असल्यास त्यावरही हा उपाय फायदेशीर ठरतो.
जोजोबा तेल –
त्वचेला थोडे कोमट केलेले जोजोबा तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
बदाम तेल –
त्वचा कोरडी पडत असल्यास त्वचेला बदाम तेल लावून मसाज करणेही उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला थोडे बदाम तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.
मध –
त्वचेला मध लावल्यानेही त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एक वेळा हा उपाय आपण करू शकता.
हे सुद्धा वाचा..
त्वचेला खाज सुटणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Dry skin causes and Home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.