दाढ दुखणे –

दाढ दुखी अनेक कारणांनी होऊ शकते. विशेषतः दाढेची योग्य काळजी न घेतल्यामुळे, दाढ किडल्यामुळे, दाढेत अन्नाचे कण अडकल्याने, दाढेची मुळे सैल झाल्यामुळे, हिरड्या सुजल्यामुळे दाढ दुखी होत असते. यामुळे दाढेच्या ठिकाणी भयंकर वेदना होत असतात.

दाढ दुखीवर घरगुती उपाय –

1) दुखण्याऱ्या दाढेजवळ लवंग धरून ठेवावी.
दाढ दुखत असल्यास लवंग खूप उपयोगी ठरते. लवंगमधील anesthetic आणि analgesic या गुणामुळे दाढेतील वेदना व सूज कमी होते. यासाठी दुखणाऱ्या दाढेजवळ लवंग तेल कापसाच्या बोळ्याने लावल्यास दाढदुखी दूर होते. तसेच दाढेत लवंग धरून ठेवणेही उपयोगी ठरते.

2) तुळशीच्या पानांचा रस कापरात मिसळून दाढेला लावावा.
तुळशीची पाच ते सहा पाने स्वच्छ धुवून बारीक वाटून त्यांचा रस काढावा. या रसात 3 ते 4 कापराच्या वड्या मिसळाव्यात. कापसाचे बोळे या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत. यामुळे दाढदुखी थांबते.

3) दाढ दुखत असल्यास पेरूची पाने चावत रहावीत.
पेरूच्या पानात anti-inflammatory आणि antimicrobial हे गुण असतात. त्यामुळे हिरड्यांना आलेली सूज व इन्फेक्शन कमी होऊन वेदना दूर होते. यासाठी पेरूची पाने स्वच्छ धुवून तोंडात चघळत राहावीत.

4) दाढ दुखत असल्यावर तेथे चिमुटभर हिंग लावावे.
हिंगसुद्धा दाढदुखीवर ते गुणकारी ठरते. यासाठी चिमुटभर हिंग दुखणाऱ्या दाढेजवळ लावावे यामुळे दाढ दुखणे कमी होण्यास मदत होईल.

दाढ दुखत असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्या..

घरगुती उपायांनी दाढ दुखी कमी न आल्यास आपल्या दंतरोगतज्ञ डॉक्टरांकडून (डेंटिस्टकडून) दाढांची तपासणी व उपचार करून घ्यावेत.

दाढ दुखीवरील गोळी –

दाढदुखी हा त्रास सामान्य असल्यास Paracetamol आणि Ibuprofen हे घटक असणारी वेदनाशामक गोळी घेऊ शकता. यामुळे दाढ दुखी थांबण्यास मदत होईल. वेदनाशामक गोळीमुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो यासाठी वरील वेदनाशामक गोळीबरोबर Antacids ची गोळीही घ्यावी.

हे सुध्दा वाचा – दात किडणे यावरील उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Toothache causes and home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *