हलणारे दात..

दात मुळापासून सैल झाल्याने दात हलू लागतो. प्रामुख्याने दात व हिरड्यांची योग्य काळजी न घेणे, कठीण वस्तू दातांनी चावण्याचा प्रयत्न करणे किंवा शरीरातील कॅल्शिअम ची कमतरता अशा विविध कारणांनी दात हलत असतो.

दात हलतो तेंव्हा दाताच्या ठिकाणी दुखू लागते, तसेच यामुळे हिरडीला सूज देखील येऊ शकते. अशावेळी अन्नपदार्थ चावताना दातांच्या ठिकाणी जास्त दुखत असते.

दात हलत असल्यास हे उपाय करावे –

  • हळद आणि काळी मिरी पावडर एकत्र करून त्याने हिरड्यांना मालिश करा. यामुळे दातांची मुळे घट्ट होण्यास मदत होते.
  • रोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहण्यास मदत होते.
  • दात हलत असल्यास ऑईल पूलिंग करावे. यासाठी ब्रश करण्यापूर्वी तोंडात एक चमचा खोबरेल तेल घेऊन ते तोंडाच्या आतील बाजूस फिरवत राहा. आणि 15 मिनिटांनी चूळ भरावी व ते तेल थुंकून टाका. यामुळे हिरड्या मजबूत होऊन दात हलण्याची समस्या दूर होते.
  • दात हलत असल्यास हिरड्या मजबूत होण्यासाठी कडुनिंबाची पाने दातांनी चावत राहावी. यामुळे हिरड्या निर्जंतूक व बळकट होतात.
  • दात हलत असल्यास आहारात व्हिटॅमिन-C चा समावेश करावा. यासाठी आवळा, संत्री, मोसंबी, पपई, किवी, स्ट्रॉबेरी अशी व्हिटॅमिन-C युक्त असणारी फळे खावीत.

हे सुध्दा वाचा – दात दुखत असल्यास करायचे उपाय जाणून घ्या..

दातांची अशी घ्यावी काळजी ..

  • दिवसातून दोनदा व्यवस्थित दात घासा.
  • तोंडाची स्वच्छता ठेवावी. दात घासताना जीभही स्वच्छ करा.
  • जेवल्यानंतर चूळ भरायला विसरू नका. यासाठी माउथवॉशचा वापर करा.
  • दात घासताना हिरड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
  • गोड पदार्थ सतत खाणे टाळावे.
  • जास्त कठीण असणारे पदार्थ दातांनी चावणे टाळावे.
  • सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
  • तंबाखू, पानमसाला, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
  • डेंटिस्टकडून वर्षातून एकदा दातांची तपासणी करून घ्यावी.

हे सुध्दा वाचा – हिरड्या मजबूत होण्यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.

Read Marathi language article about home remedies for Loose Teeth. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.