सायकल चालवण्याचे सामाजिक फायदे :
सायकल चालवण्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन आरोग्य सदृढ राहते त्याचप्रमाणे सायकल चालवण्याचे सामाजिक फायदेही अनेक आहेत. सायकलमुळे पर्यावरणाची हानी कमी होते, इंधन लागत नाही, प्रदूषण होत नाही, अपघातांचे प्रमाण कमी होते, वाहतूक कोंडी होत नाही असे सायकलचे सामाजिक फायदे होतात.
सायकलचे सामाजिक फायदे :
सामाजिक आरोग्याचा दर्जा सुधारतो..
सायकलिंगमुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षघात यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने सामाजिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
वाहतुकीचे प्रश्न कमी होतात..
सायकल चालवणे सोपे असते, सायकलमुळे वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक जाम) होत नाहीत तसेच पार्किंगच्या समस्याही होत नाहीत. याशिवाय जीवघेणे अपघातही होत नाहीत. सायकलमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाणही इतर वाहनांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे रस्ते व वाहतुकीचे प्रश्न कमी होण्यास सायकलमुळे मदत होते.
इंधन लागत नाही..
सायकल चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती देशात जाणारा इंधनासाठी जाणारा देशाचा पर्यायाने समाजाचा पैसा वाचण्यास मदत होते.
पर्यावरणाचे रक्षण होते..
सायकलच्या वापरामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होते.
तसेच सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. अशाप्रकारे सायकल वापरण्याचे अनेक सामाजिक फायदे असतात.
हे सुद्धा वाचा..
सायकलच्या व्यायामामुळे होणारे फायदे जाणून घ्या.