डोळ्यात जलन होणे :
आपले डोळे अतिशय संवेदनशील व नाजूक असतात. त्यामुळेचं त्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. ऍलर्जी, हवेतील प्रदूषण, धूळ, कचरा, उन्हात फिरणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर, स्मार्टफोन-लॅपटॉप किंवा टीव्हीचा अतिवापर, झोपेच्या तक्रारी, चिडचिड, पाणी कमी पिण्याची सवय अशा अनेक कारणांनी डोळ्यांमध्ये जलन होत असते.
डोळ्यांची जलन कमी करण्यासाठी उपाय :
काकडीचे काप –
डोळ्यात होणारी जलन कमी करण्यासाठी काकडीचा वापर करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी काकडीचे बारीक काप करून ते फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर काकडीचे हे थंड तुकडे डोळ्यावर ठेवा आणि थोडावेळ झोपून राहा. यामुळे डोळ्यात होणारी जलन दूर होण्यासाठी हा घरगुती उपाय फायदेशीर आहे.
एरंडेल तेल –
एरंडेल तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून घ्या आणि हलके पिळून घ्या. यानंतर, तो बोळा आपल्या डोळ्यांवर पसरून काहीवेळ झोपा. याशिवाय आपण आपल्या बोटांना एरंडेल तेल लावून डोळ्यांच्या पापणीवर हलके मालिश करू शकता. यामुळेही डोळ्यातील जलन कमी होते.
गुलाबजल –
डोळ्यात होणारी जलन दूर करण्यासाठी गुलाबाचे पाणी देखील खूप उपयुक्त आहे. गुलाब पाण्याचे एक-दोन थेंब आपल्या डोळ्यांत घालू शकता आणि थोडावेळ झोपू शकता. गुलाब जलामुळे डोळे साफ होऊन डोळ्यात जलन होणे कमी होते.
थंडगार दूध –
आपल्या बोटांच्या साहाय्याने डोळ्यांवर थंड दूधाने मालिश केल्यास डोळ्यातील जलन दूर होण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा..
डोळे लाल होणे
Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.