
प्रेग्नन्सीचा नववा महिना आणि बाळाची हालचाल :
नववा महिना हा गर्भधारणेचा शेवटचा महिना असून त्यानंतर डिलिव्हरी होऊन बाळाचा जन्म होत असतो. गर्भाचे डोके खालच्या बाजूला होते व हळूहळू स्त्रीच्या pelvic भागात सरकत असते. या शेवटच्या महिन्यात बाळाची पूर्ण वाढ होत असते. त्यामुळे हालचाल करण्यासाठी बाळाला जागा अपुरी पडू लागते.
नवव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी होत असते :
गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात बाळाची हालचाल कमी होत असते आणि ही एक नॉर्मल बाब आहे. कारण, या महिन्यात बाळाच्या आकारात वाढ झाल्याने गर्भाशयात त्याला हालचाल करण्यास पुरेशी जागा नसल्याने बाळाची हालचाल कमी होते.
परंतु जेव्हा जेव्हा बाळाची हालचाल होईल तेव्हा ती आपणास स्पष्ट जाणवेल. या महिन्यात बाळाच्या लाथा (बेबी किक्स), हाताने पंच मारणे अशा हालचाली स्पष्टपणे जाणवत असतात. दिवसातील कोणत्याही दोन तासांमध्ये बाळाच्या किमान 10 किक्स जाणवल्या पाहिजेत.
बाळ हालचाल कमी करीत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
डिलिव्हरीपर्यंत गर्भाच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर हालचाली कमी जाणवल्या तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. दिवसभरात कोणत्याही दोन तासांमध्ये जर बाळाची हालचाल 10 वेळा जाणवली नसल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात नवव्या महिन्यात घ्यावयाची काळजी व आहार याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Information about 9 month pregnancy baby movement in Marathi.
मुतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय