भाताच्या कोंड्याचे तेल खाण्यामुळे होणारे फायदे – Health Benefits of Rice bran oil in Marathi

भात कोंड्याचे तेल – Rice Bran Oil :

राईस ब्रॅन ऑइल हे भाताच्या कोंढ्यातून काढले जाते. आरोग्यासाठी हे तेल अत्यंत हितकारक आहे. त्यामुळेच राईस ब्रान तेलाचा स्वयंपाकामध्ये वापर आज वाढला आहे. राईस ब्रॅन तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी माहिती खाली दिली आहे.

उपयुक्त पोषकतत्वे असतात..

राईस ब्रॅन तेल हे हेल्दी फॅट, व्हिटॅमिन-E आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक घटकांचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट (unsaturated fats) ह्या चांगल्या स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे यात व्हिटॅमिन-E सुद्धा मुबलक प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-E ची भूमिका महत्त्वाची असते.

याशिवाय राईस ब्रॅन तेलात असणारे टोकोट्रिएनोल्स, ऑरिजॅनॉल आणि प्लांट स्टिरॉल्स हे घटकसुद्धा आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरतात.

रक्तातील साखर आटोक्यात ठेवते..

राईस ब्रान तेलामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास व इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे टाईप-2 डायबेटीस होण्यापासून रक्षण होते. तसेच डायबेटीस रुग्णांसाठीसुद्धा हे तेल उपयुक्त असते.

हृदयासाठी उपयुक्त..

राईस ब्रॅन तेल हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (म्हणजे LDL कोलेस्टेरॉल) कमी करते तर, HDL प्रकारचे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉलमुळे होणारे हार्ट अटॅक, पक्षाघात, उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज 5 ग्रॅम राईस ब्रान कच्चे तेल खावे.

तसेच या तेलात असणाऱ्या ऑरिजॅनॉल (oryzanol) व टोकोट्रिएनोल्स ह्या अँटी-ऑक्सिडंट व anti-inflammatory गुणधर्माच्या एंजाइममुळे रक्तवाहिन्यातील दाह कमी होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या कडक होऊन धमनीकाठिण्य (atherosclerosis) ही हृदयासंबंधित गंभीर स्थिती होत नाही. अशाप्रकारे हे तेल हृदयासाठी फायदेशीर ठरते.

कॅन्सरपासून रक्षण करते..

भाताच्या कोंड्यातील तेलात असणाऱ्या टोकोट्रिएनोल्स (tocotrienols) ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे वेगवेगळ्या कॅन्सरपासून रक्षण होण्यास मदत होते.

किडनी स्टोनमध्ये उपयुक्त..

राईस ब्रॅन तेलामुळे किडनी स्टोन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी दिवसातून दोनवेळा 10 ग्रॅम राईस ब्रान तेलाचा आहारात समावेश करावा.

त्वचेतील खाज कमी करते..

त्वचेला खाज येत असल्यास त्याठिकाणी थोडे राईस ब्रॅन तेल लावून मालिश केल्यास त्वचेतील खाज कमी होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

राईस ब्रान तेलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचा smoke point हा जास्त असतो. त्यामुळे हे तेल जास्त उकळले तरीही यातील पोषकघटक कमी होत नाहीत. अनेक तेले अशी असतात की, ती अधिक उकळल्यास त्यातील पोषकतत्वे नष्ट पावतात, त्यात घातक असे ‘फ्री-रॅडिकल्स’ तयार होते. व खाद्यपदार्थातून असे निकृष्ट घातक तेल शरीरात जात असते. त्यादृष्टीने राईस ब्रान तेल हे त्याच्या ‘हाय स्मोक पॉईंट’ ह्या गुणामुळे आरोग्यासाठी उपयुक्त असते.

राईस ब्रॅन तेल खाण्यामुळे होणारे नुकसान – Rice bran oil Side Effects :

राईस ब्रान ऑइल हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामानाने या तेलामुळे होणारे तोटे किंवा नुकसान फारच कमी आहेत. अधिकप्रमाणात हे तेल खाल्यास पोट बिघडू शकते. गरोदरपणात हे तेल वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.

हे सुद्धा वाचा..
जवस खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..