लहान बाळाची सर्दी :
बाळाला सर्दी पडस्याचा त्रास अनेक कारणांनी होऊ शकतो. विशेषतः थंड वातावरण, इन्फेक्शन यांमुळे बाळांना वरचेवर सर्दी होत असते.
सर्दी झाल्यास बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसेच सर्दीवाटे शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनही होऊ शकते. त्यामुळे बाळाची सर्दी सामान्य वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये.
बाळाला सर्दी झाल्यास अशी घ्यावी काळजी :
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दीवरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. तसेच नाकात घालणारे ड्रॉप्स किंवा स्प्रेसुद्धा बाळासाठी वापरू नयेत. बाळास सर्दीचा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.
सर्दीवाटे शरीरातील पाणी कमी होऊन बाळामध्ये डिहायड्रेशन होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्यावी. यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. 6 महिन्यापेक्षा अधिक वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर तरल पदार्थ, वरचे दूध, ओआरएस मिश्रण द्यावे.
Read Marathi language article about Common cold in babies. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.