बाळाला वरचे दूध पाजणे – Milk alternatives :
बाळाला काही कारणाने आईचे दूध मिळू शकत नसेल उदा. आई आजारी असल्यास व तिचे दूध देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यास किंवा तत्सम इतर कारणे असल्यास बाळाला वरचे दूध किंवा फॉर्म्युला दूध द्यावे लागते.
बाळासाठी कोणते वरचे दूध चांगले असते..?
साधारणत: बाळाला गाईचे, म्हशीचे किंवा पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. त्यातल्या त्यात गाईचे दूध बाळासाठी जास्त चांगले असते. बाळाला वरचे दूध पाजताना ते बनविण्याची पद्धती ही नीट समजून घ्यावी. कारण बाळाच्या दुधात दूध प्रकारानुसार व वयानुसार उकळून थंड केलेले पाणी योग्य प्रमाणात मिसळणे आवश्यक असते.
बाळाला वरचे दूध देताना कोणती काळजी घ्यावी..?
- बाळाला वरचे दूध पाजताना शक्यतो वाटी व चमच्याचा वापर करावा, बाटली टाळावी.
- दूध पाजण्यासाठी वापरात येणारी भांडी स्वच्छ असावीत. वापरण्यापूर्वी भांडी पाच मिनिटे पाण्यात उकळून घ्यावीत.
- बाळासाठी वरचे दूध तयार करण्यापुर्वी आपले हात स्वच्छ साबनाने धुवावेत.
- वरचे दूध तयार करण्यासाठीचे दूध व पाणी गरम करूनच वापरावे.
- दूध व पाणी बाळाच्या वयानुसार योग्य प्रमाणामध्येच मिसळावे.
- बाळास अतिशय गरम किंवा थंड दूध कधीही देऊ नये. यासाठी त्या दुधाचे काही थेंब आपल्या हातावर टाकून ते बाळास पिण्यायोग्य कोमट असल्याची खात्री करून घ्यावी.
साधारणपणे बाळाला गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यात दोन भाग दूध व एक भाग पाणी असे प्रमाण असावे. दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध व एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जावे.
दुधात पाण्याचे प्रमाण किती असावे..?
बालकासाठी वरचे दूध पाजताना त्यात पाणी घालावे. या पाण्याचे पुढील प्रमाणे प्रमाण असावे. बालकांसाठी आईचे दूध हे प्रमुख आहार असून तो सहा महिन्यापर्यंत मिळणे आवश्यक असते. पण काही वेळेस बालकास सुरवातीपासूनच वरचे दूध देण्याची स्थिती येऊ शकते अशावेळी वरच्या दुधात पाण्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.
जन्मापासून पहिल्या पाच दिवसांपर्यंत – 1 भाग दूध व 2 भाग पाणी मिसळावे.
सहाव्या दिवसापासून एक महिन्यापर्यंत – एक भाग दूध व एक भाग पाणी मिसळावे.
दुसऱ्या ते चौथ्या महिन्यापर्यंत – दोन भाग दूध व एक भाग पाणी मिसळावे.
चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत – तीन भाग दूध व एक भाग पाणी मिसळावे.
सहा महिन्यानंतर दूधात पाणी घालून देण्याची आवश्यकता नसते. सुरवातीस अशक्त बालकासाठी दुधात पाणी जास्त प्रमाणात मिसळावे लागते. आणि त्याची पचनशक्ती सुधारल्यावर मग, दुधाचे प्रमाण वाढवावे लागते.
दुधात साखरेचे प्रमाण किती असावे..?
बाळाला देण्यात येणाऱ्या दुधाला मधूर चव यावी, बाळ दुध आवडीने पिण्यासाठी दुधात साखर मिसळून द्यावी.
सामान्यता 25 ml दुधामध्ये एक चमचा साखर मिसळावी. तसेच बाळास पोट साफ न होण्याचा (खडा धरण्याचा) त्रास होत असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे आणि जुलाब होत असल्यास साखरेचे प्रमाण कमी करावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
हे सुद्धा वाचा..
बाळाचे आरोग्य या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Milk alternatives for baby in Marathi information. Article written by Dr Satish Upalkar.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.