फॉर्म्युला दूध पावडर – Formula milk in Marathi :

नवजात बाळासाठी आहार म्हणून आईचे दूध हेच सर्वात चांगले असते, परंतु काहीवेळा अनेक नवजात बालके ही काही कारणास्तव आईच्या दुधापासून वंचित राहू शकतात. अशावेळी त्या बाळाला फॉर्म्युला दूध दिले जाते. तथापि, फॉर्म्युला दुधाबाबत पालकांचे अनेक प्रश्न व शंका असू शकतात. यासाठी येथे फॉर्म्युला दूध पावडर म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली आहे.

फॉर्म्युला मिल्क पावडर म्हणजे काय..?

फॉर्म्युला दूध हे आईच्या दुधाला पर्याय म्हणून बाळाला दिले जाऊ शकते. फॉर्म्युला दूध पावडर ही विविध जीवनसत्त्वे, साखर, फॅट आणि इतर पौष्टिक पदार्थ एकत्र करून तयार केरतात. बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतेक फॉर्म्युला दुधाचा मुख्य घटक म्हणजे गायीचे दूध हे असते. गाईच्या दुधाच्या प्रथिनेपासून फॉर्म्युला दुध पावडर बनविलेली असते. यामध्ये लॅक्टोज आणि खनिजतत्वेदेखील असतात.

बाळाला फॉर्म्युला दूध देणे सुरक्षित असते का..?

काही कारणांमुळे आई स्तनपान करण्यास अक्षम असते किंवा आईचे दूध बाळास मिळत नसल्यास अशावेळी बाळाचे पोषण करण्यासाठी त्याला फॉर्म्युला दूध दिले जाते. त्यामुळे जर बाळाला आईचे दूध मिळत नसल्यास त्याच्यासाठी फॉर्म्युला दूध एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो. तथापि, बाळाला फॉर्म्युला दूध देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी. जेणेकरून ते बाळाचे वय आणि आरोग्य विचारात योग्य असा फॉर्म्युला दूध सुचवू शकतील. 

फॉर्म्युला दूध कसे तयार करावे..?

फॉर्म्युला दुधाचा डब्बा किंवा पॅकेट उघडल्यानंतर एका महिन्याच्या आत पावडर वापरावी. फॉर्म्युला दुधाच्या बाटली किंवा पॅकेटमधील expiry date चेक करावी. जर त्याची expiry date होऊन गेलेली असल्यास ती पावडर वापरू नका. शक्यतो पॅकेटवरील सूचनांचे पालन करून त्यानुसार फॉर्म्युला दूध तयार करावा.

 • बाळासाठी फॉर्म्युला दूध बनवण्यापूर्वी आपले हात नीट धुवावेत.
 • एका भांड्यात स्वच्छ पाणी उकळत ठेवावे.
 • बाटलीत किंवा वाटीत गगरम केलेले पाणी दिलेल्या प्रमाणात घालावे.
 • पाकिटातील चमच्याने दिलेल्या प्रमाणात पावडर घेऊन ती गरम करून घेतलेल्या पाण्यात घालावी.
 • मिश्रण चांगले ढवळून एकजीव करावे.
 • मिश्रण बाळासाठी पिण्यायोग्य कोमट झाल्यावर बाळाला पाजावे.

जेंव्हा लागेल तेंव्हाच ताजे फॉर्म्युला दूध तयार करून वापरावे. एकाचवेळी भरपूर प्रमाणात केलेले फॉर्म्युला दूध वापरू नये.

बाळाला किती वेळा फॉर्म्युला दूध द्यावे..? 

फॉर्म्युला दूध दररोज 6 ते 8 वेळा बाळाला दिले जाऊ शकते. कृपया याबद्दल एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

फॉर्म्युला दूध देणे कधी थांबवावे..?

बाळाचे वय एक वर्ष झाल्यावर फॉर्म्युला दूध देणे थांबवू शकता.

बाळाला फॉर्म्युला दूध देण्याचे तोटे :

 • आईच्या दुधातून मिळणाऱ्या ऍन्टीबॉडीज फॉर्म्युला दूधात नसतात.
 • स्तनपानाला पर्यायी असले तरीही फॉर्म्युला दूध हे आईच्या दुधासारखे नसते.
 • जेंव्हा बाळाला भूक लागेल तेंव्हा तेंव्हा ते नवीन तयार करावे लागते.
 • पावडरच्या दुधामुळे बाळास गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
 • आईचे दूध हे विनामूल्य असते तर फॉर्म्युला दूध हे महाग असून विकत घ्यावे लागते.

अशाप्रकारे आईचे दूध हेच नवजात बाळासाठी श्रेष्ठ आहार असतो. आईचे दूध उपलब्ध न झाल्यासचं फॉर्म्युला दूधाचा वापर केला पाहिजे.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
बाळाचे आरोग्य या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Formula Powder milk for baby in Marathi information. Article written by Dr Satish Upalkar.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...