अंगातील उष्णता कमी करणे –
अंगात उष्णता वाढल्याने डोके सारखे दुखणे, पित्ताचा त्रास होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे यासारखे त्रास होऊ लागतात.
अंगातील उष्णता वाढण्याची कारणे –
- मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते.
- चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे अंगात उष्णता वाढते.
- वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते.
- मद्यपान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे देखील अंगातील उष्णता वाढते.
अंगातील उष्णता कमी करण्याचे उपाय –
एक चमचा धने व जिरे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून घेऊन प्यावे. यामुळे लघवीवाटे अंगातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. लघवीला आग होणे यावरील उपाय जाणून घ्या..
अंगातील उष्णता कमी करण्यासाठी दिवसभरात वरचेवर पाणी पीत राहावे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस असे द्रवपदार्थ प्यावेत.
अंगातील उष्णता कमी करण्यासाठी जिरेपूड घातलेले ताक प्यावे. जिरेपूड घातलेले ताक पिण्यामुळे अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपताना तळपायाला खोबरेल तेल लावून कास्याच्या वाटीने मालिश करावी. यामुळेही अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
अंगातील उष्णता आणि आहार पथ्य –
- अंगात उष्णता अधिक असल्यास चिकन, मांस, मासे, अंडी असे मांसाहारी पदार्थ खाणे कमी करावे.
- तेलकट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे.
- मद्यपान, तंबाखू सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- कलिंगड, डाळींब, संत्री यासारखी रसदार फळे खावीत.
हे सुध्दा वाचा – कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Reduce Body Heat. Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.