हळद (Turmeric) :
अन्नपचनाच्या दृष्टीने हळदीचा रोजच्या स्वयंपाकातील वापर महत्त्वाचा. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाही तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो.
गुणकारी हळद :
1) सर्दी-खोकल्यात दुधात हळद टाकून प्यायल्यास फायदा होतो.
2) तोंड आल्यास कोमट पाण्यात हळद पावडर मिक्स करुन त्याच्या गुळण्या करा.
3) जखमेवर हळद गुणकारी ठरते.
4) जेवणानंतर येणारे जडत्व, पोटात होणारी जळजळ, गॅसेस यांवर हळद उत्तम गुणकारी आहे. जेवणातील हळदीचे प्रमाण थोडे वाढवल्यास वा जेवणानंतर अर्धा चमचा हळद कोमट पाण्याबरोबर घेतल्यास या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
5) हळद जंतूविरोधी असल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर (त्वचा, घसा, तारुण्यपीटिका इ.) हळद उपयोगी पडते.
6) हळदीतील कर्कुमिन नावाचे तत्त्व आपला कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते.
7) हळद बुरशीनाशक तसेच सूजनाशक आहे. त्यात ब, क, ई ही जीवनसत्त्वे असून लोह, कॅल्शियम, तांबे, पोटँशियम, जस्त व मॅग्नेशियमही आहे.
हे देखील वाचा – काळी मिरी खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Article about Turmeric health benefits in Marathi. last Medically reviewed by Dr. Satish Upalkar on 10 February 2024.