उलटी होणे –
उलटी होण्याचा त्रास सर्वानाच वरचेवर होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे काही आजारातील एक लक्षण देखील असू शकते.
उलटी कशामुळे होते..?
पचनसंस्थेतील बिघाड, पोटातील इन्फेक्शन, मायग्रेन डोकेदुखी, अल्सर, प्रवासात गाडी लागणे, दारू व तंबाखू सारखी व्यसने, गर्भावस्था, अन्न विषबाधा अशा अनेक कारणांमुळे उलटी होत असते.
उलटी थांबवण्यासाठी उपाय –
- आल्याचा तुकडा मधाबरोबर खाल्याने उलटी कमी होते.
- उलटी थांबवण्यासाठी आल्याचा तुकडा लिंबू रसाबरोबर खावा.
- उलटी होत असल्यास चमचाभर मधात लिंबू रस मिसळून खावा.
- उलटी थांबवण्यासाठी लवंग किंवा वेलदोडे चघळत राहावे. ह्या उपायांनी उलटी थांबण्यास मदत होते.
उलट्या होत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
जास्त उलट्या होणे, अन्न विषबाधा झालेली असणे, जुलाब लागणे, शौचावाटे रक्त पडणे, पोटात दुखणे, उलटीतून रक्त पडणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. तसेच लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यांना सारख्या उलट्या होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
हे सुध्दा वाचा – मळमळ होण्याची कारणे व उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Vomiting Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.