चिकट संडास होणे –
अनेक कारणांमुळे संडासला चिकट होत असते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यामुळे देखील संडासला चिकट होऊ लागते.
संडास चिकट होण्याची कारणे –
- दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यामुळे पोट बिघडल्याने संडासला चिकट होते.
- अल्सर, स्वादुपिंड सूज, क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलिआक रोग या आजारामुळे चिकट संडास होऊ शकते.
- तसेच तेलकट व चरबीचे पदार्थ अधिक खाणे, दुधाचे पदार्थ न पचणे, लोहाच्या गोळ्या किंवा बिस्मथ घटक असणारी औषधे घेण्यामुळे चिकट संडासला होऊ शकते.
चिकट संडास होणे यावरील उपाय –
चिकट संडास होत असल्यास पुरेसे पाणी व इतर द्रवपदार्थ प्यावेत. पुरेसे पाणी पिणे हा यावरील सर्वात चांगला उपाय आहे. शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी, ताज्या फळांचा रससुध्दा यावेळी पिऊ शकता.
चिकट संडास होत असल्यास ताकात थोडे हिंग, सुंठ, मिरी, जिरे, सैंधव मीठ घालून ते ताक प्यावे.
चिकट संडास होत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा सुंठ मिसळून ते पाणी प्यावे.
चिकट संडास होत असल्यास दहीभात खावा. तसेच मेथी दाण्याचे चूर्ण दह्यात मिसळुन खाल्याने हा त्रास कमी होतो. हे उपाय चिकट संडास होणे यावर उपयोगी पडतात.
संडासला चिकट होत असल्यास काय खाऊ नये ?
- अशावेळी बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
दूषित पाणी पिणे टाळावे. - तेलकट व चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
- दुधाचे पदार्थ पचत नसल्यास दूध व दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे.
- ग्लूटेनयुक्त पदार्थ म्हणजे गहू, मैद्याचे पदार्थ खाणे कमी करावे. अशी काळजी यावेळी घ्यावी.
हे सुध्दा वाचा – रक्ताची संडास होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about sticky stool Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.