त्वचेवरील काळे डाग –
बऱ्याच जणांच्या त्वचेवर काळे डाग पडलेले असतात. मेलॅनीनची अधिक निर्मिती होणे, हार्मोन्समधील असंतुलन, प्रखर उन्हात काम करणे अशा विविध कारणांनी त्वचेवर काळे डाग पडत असतात.
त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे –
प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. याशिवाय उन्हात काम करणे, प्रदूषण, घाम, त्वचेची स्वच्छता न ठेवणे यामुळे देखील त्वचेवर काळे डाग पडतात. तसेच हार्मोन्समधील असंतुलन, त्वचेवरील जखमा, त्वचा भाजणे यामुळेही त्वचेवर काळे डाग पडतात.
त्वचेवरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय –
1) काळ्या डागांवर हळदीचा लेप लावा.
त्वचेवरील काळ्या डागांवर हळदीचा लेप लावून हलकी मालिश करावी. हा उपाय नियमित काही दिवस केल्यास त्वचेवरील काळे डाग निघून जातात.
2) काळ्या डागांवर मध व लिंबू रसाचे मिश्रण लावा.
त्वचेवरील काळे डाग जाण्यासाठी दोन चमचे मधात थोडासा लिंबाचा रस मिसळून काळ्या डागांवर लावावा. थोड्या वेळाने पाण्याने धुवून त्वचा स्वच्छ करावी.
3) त्वचेवरील काळ्या डागांवर बटाटा चोळा.
बटाट्याचे तुकडे त्वचेवरील काळ्या डागांवर चोळावे यामुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
4) त्वचेवरील काळ्या डागांवर उटणे लावा.
त्वचेवरील काळ्या डागांवर आयुर्वेदिक उटणे लावून हलकी मालिश करावी. त्वचेवरील काळे डाग जाण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी पडतो.
त्वचेवर काळे डाग पडू नयेत यासाठी घ्यायची काळजी –
- उन्हात बाहेर फिरताना त्वचेला सनस्क्रीन लावावे.
- दररोज स्वच्छ अंघोळ करा. आंघोळीसाठी सौम्य साबण वापरा.
- केमिकलयुक्त साबण, परफ्युम वापरणे टाळा.
- सुती कपडे वापरा.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा यांचा समावेश अधिक असावा.
- वारंवार तेलकट, खारट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे. अशी काळजी घेतल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
हे सुध्दा वाचा – त्वचेला खाज सुटणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Dark spots on the Skin causes and home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.