प्रेग्नन्सीचा आठवा महिना आणि बाळाची हालचाल :
गर्भधारणेच्या आठव्या महिन्यापर्यंत, पोटातील बाळ जवळजवळ पूर्ण विकसित झालेले असते. बाळाचा विकासही अधिक झालेला असतो. आठव्या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 1 ते 1.25 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते.
आठव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी होत असते :
गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात बाळाचा आकार इतका वाढलेला असतो की त्याने गर्भाशय घेरले जाते. त्यामुळे बाळाला हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नसते. अशावेळी बाळाच्या केवळ हातापायाच्या हालचाली होत असतात. या महिन्यात बाळाच्या लाथा (बेबी किक्स), हाताने पंच मारणे अशा हालचाली स्पष्टपणे जाणवत असतात.
बाळ हालचाल कमी करीत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंत गर्भाच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर हालचाली कमी जाणवल्या तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. दिवसभरात कोणत्याही दोन तासांमध्ये जर बाळाची हालचाल 10 वेळा जाणवली नसल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात आठव्या महिन्यात घ्यावयाची काळजी व आहार ते जाणून घ्या
Read Marathi language article about 8 month pregnancy baby movement. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.