प्रेग्नन्सीचा सातवा महिना आणि बाळाची हालचाल :

गरोदरपणाचा शेवटचा तिमाही सातव्या महिन्यापासून सुरू होतो. सातव्या महिन्यात गर्भाची वाढ अधिक होत असते. या महिन्यात पोटातील बाळ हे बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते, तसेच ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते. गर्भाची हालचाल या महिन्यात आईला चांगल्यारीतीने जाणवायला लागते.

सातव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी होत असते :

प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात आईला पोटातील बाळाच्या लाथा (बेबी किक्स) जाणवू लागतात. बेबी किक्स बरोबरच बाळ पंच मारणे, रोलिंग करणे, गर्भाशयात फिरणे, फडफड करणे अशा विविध हालचाली करत असते.

तसेच काहीवेळा पोटातील बाळाला उचकीही लागल्याचेही तुम्हाला जाणवू लागते. पोटातील बाळाला लागलेली उचकी ही एक नॉर्मल क्रिया असून यात काही घाबरण्याचे कारण नसते.

सातव्या महिन्यात गरोदर मातेने जाणवणाऱ्या बेबी किक्स व हालचालीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. दररोज दोन तासांमध्ये किमान 10 वेळा बाळाची हालचाल आईला जाणवली पाहिजे.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळ हालचाल कमी करीत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?

सातव्या महिन्यात जर गर्भाची हालचाल कमी होत असल्याचे जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. काहीवेळ बाळ हे झोपत असते अशावेळी त्याच्या हालचाली कमी असू शकतात.

मात्र दिवसभरात कोणत्याही दोन तासांमध्ये जर बाळाची हालचाल 10 वेळा जाणवली नसल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कॉपीराइट - डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात सातव्या महिन्यात घ्यावयाची काळजी व आहार याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Information about 7 month pregnancy baby movement in Marathi.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. करा.