आठ महिन्याच्या बाळाचा आहार, वजन आणि झोप अशी असावी – 8 month baby care tips in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

आठ महिन्यांचे बाळ :

बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी आठ महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली आहे.

आठ महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :

प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 7.0 ते 10.5 किलो आणि उंची 73 सेमी पर्यंत इतकी असू शकते. 
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 6.3 ते 10.0 किलो असते आणि उंची सुमारे 70 सेमी पर्यंत असू शकते.

आठ महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :

• आधाराशिवाय बसायला शिकतात.
• बाळ रांगण्याचा प्रयत्न करते.
• खेळण्यांनी खेळायला रस दाखवतात.
• आवडीचा आहार पाहून किंवा अंघोळीसाठी जाताना आनंद व्यक्त करतात.
• बाळाला त्याच्या नावाने हाक मारल्यास त्याकडे ते लक्ष देऊ शकतात.
• एका हातातून दुसऱ्या हातात खेळणे घेते.
• खेळणी तोंडात घालते.
• आपण बोललेली अक्षरे ते स्वतः बोलण्याचा प्रयत्न करते.

आठ महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :

या वयातील बाळांसाठी दिवसातून तीन ते चारवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून तीन ते चार वेळा मऊ आहार बाळास भरवावा.
• कुस्करलेली डाळ भात वरण, कुस्करलेली भाजी आहारात असावी.
• भात, नाचणी, ओट्स ही धान्ये व डाळी शिजवून थोडे मऊ करून बाळास भरवावे.
• दहीभात, वरणभातात तूप घालून भरवू शकता.
• मऊ शिरा किंवा उपमा, खिचडी बाळास भरवावी.
• गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा.
• बाळाच्या आहारात तूप, लोणी असे दुधाचे पदार्थ समाविष्ट करावेत.
• केळे, आंबा, टरबूज, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास भरवावा.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आठ महिन्याच्या बाळाची झोप :

8 महिन्यांमधील बाळ 24 तासांत 12 ते 14 तास झोपू शकतात. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.

आठव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :

या महिन्यात बाळ बसायला शिकते. त्यानंतर ते रांगायला शिकत असते. यासाठी बाळ बसलेले असल्यास त्याच्यासमोर रंगीबेरंगी खेळणी ठेवावीत. जेणेकरून ते खेळणी घेण्यासाठी रांगत जाण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय,
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
• पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.

डॉक्टरांकडे कधी जावे..?

बाळाला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..