Dr Satish Upalkar’s article about 7 months baby care tips in Marathi.
सात महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लेखात सात महिन्याच्या बाळाला कोणता आहार द्यावा, त्याला काय खाऊ घालायचे तसेच या महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
सात महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 6.7 ते 10.2 किलो आणि उंची 72 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 6.1 ते 9.6 किलो असते आणि उंची सुमारे 68 सेमी पर्यंत असू शकते. वयानुसार बाळाचे वजन व उंची किती असावी ते जाणून घ्या..
सात महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
- या महिन्यात बाळ आधाराने बसू लागते.
- बाळ खेळणी उचलून हलविते व फेकू शकते.
- बाळाला नावाने हाक मारल्यास ते प्रतिसाद देते.
- अन्न चावण्यास शिकत असते.
- बाळ बोलायचा प्रयत्न करतते.
- बाळ एकेक अक्षर बोलू लागते.
सात महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
या वयातील बाळांसाठी दिवसातून चार ते पाचवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून दोन ते तीन वेळा पातळ आहार बाळास भरवावा. आहार चावता येत नसल्याने बाळाला दात येईपर्यंत थोडा पातळ आहार देणे आवश्यक असते. यासाठी आहारात,
- तांदूळ किंवा नाचणीपासून दूध घालून बनवलेली पौष्टिक खीर बाळाला द्यावी.
- डाळ शिजवून पातळ करून बाळास खाऊ घालावी.
- मऊ शिरा किंवा उपमा, पातळ खिचडी बाळास खायला द्यावी.
- बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, कुस्करून पातळ लगदा करून बाळाला खाऊ घाला.
- केळे, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास खायला द्यावे.
- सातव्या महिन्यात बाळांना फिल्टरचे किंवा उकळवून थंड केलेले पाणी देऊ शकता.
सात महिन्याच्या बाळाची झोप :
सात महिन्याचे बाळ साधारण 10 ते 14 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
सातव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
- उशीचा आधार देऊन बाळाला काहीवेळ बसवावे.
- अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
- बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
- बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
- पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
- बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
बाळाला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
हे सुध्दा वाचा – 8 महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about 7 months baby care, weight and diet plan in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
छान माहिती
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
अशीच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमचे YouTube channel देखील subscribe करा.
चॅनल लिंक – https://youtube.com/c/HealthMarathichannel