सहा महिन्यांचे बाळ :

बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लेखात सहा महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.

सहा महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :

प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 6.4 ते 9.7 किलो आणि उंची 70 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 5.8 ते 9.2 किलो असते आणि उंची सुमारे 68 सेमी पर्यंत असू शकते. वयानुसार बाळाचे वजन व उंची किती असावी ते जाणून घ्या..

सहा महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :

  • बाळाला पालथे झोपवल्यास ते पलटी होऊ शकते.
    • बाळाचे दात येण्यास सुरवात होते.
    • खेळणी तोंडात घालू लागते.
    • खेळणी पकडणे, फेकणे.
    • आवाज काढू लागते.
    • सहाव्या महिन्यात पाठीला आधार दिल्यास बाळ बसण्यास शिकते.

    सहा महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :

    या वयातील बाळांसाठी दिवसातून चार ते पाचवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून दोन ते तीन वेळा पातळ आहार बाळास खाऊ घालावा. आहार चावता येत नसल्याने बाळाला दात येईपर्यंत थोडा पातळ आहार देणे आवश्यक असते. यासाठी आहारात,

    • तांदूळ किंवा नाचणीपासून दूध घालून बनवलेली पौष्टिक खीर बाळाला खायला द्यावी.
    • डाळ शिजवून पातळ करून बाळास खाऊ घालावे.
    • मऊ शिरा किंवा उपमा, पातळ खिचडी बाळास भरवावी.
    • केळे, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास खायला द्यावी.
    • सहा महिन्यांपासून बाळांना फिल्टरचे किंवा उकळवून थंड केलेले थोडे थोडे पाणी पाजू शकता.

    सहा महिन्याच्या बाळाची झोप :

    सहा महिन्याचे बाळ 18 ते 10 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.

    सहाव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :

    सहाव्या महिन्यातही बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलतात. त्यामुळे त्याची मान, पाठ खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते तसेच बाळ पालथे होण्यास शिकते. तसेच पाठीचे स्नायू मजबूत झाल्याने बाळास बसण्यास मदत होत असते. याशिवाय,

    • उशीचा आधार देऊन बाळाला काहीवेळ बसवावे.
    • अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
    • बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
    • बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
    • पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
    • बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.

    डॉक्टरांकडे कधी जावे..?

    सहाव्या महिन्यात बाळ दूध पीत नसल्यास किंवा त्याला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.

    हे सुध्दा वाचा – 7 महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.

    Read Marathi language article about 6 months baby care. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.

  • Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

    Leave a comment

    Your email address will not be published. Required fields are marked *