गरोदरपणातील धोकादायक लक्षणे :
गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते.
कोणती लक्षणे दिसतात तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जावे..?
गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
• गर्भाशयातील बाळाची हालचाल कमी झाल्यासारखी वाटणे,
• गरोदरपणाच्य तीन महिन्यानंतर योनीतून स्त्राव येणे, योनीतून अधिक रक्तस्त्राव किंवा पाणी येत असल्यास ही चिंतेची बाब असू शकते. अशा वेळी पूर्ण आराम करावा व आपल्या डॉक्टरांकडे जावून तपासणी करून घ्यावी.
• सतत उलटी होणे. पहिल्या तीन महिन्यात उलटी व मळमळ होणे सामान्य बाब आहे मात्र त्यानंतरही उलटी होत राहिल्यास, उलटीचे प्रमाण जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
• अशक्तपणा, थकवा जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
• ताप येणे, अतिसार होणे, लघवीला जळजळ होणे, ओटीपोटात दुखणे असे त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
• पायावर सूज येणे, रक्तदाब वाढल्यामुळे अशी सूज येऊ शकते. त्यावर उपचार न केल्यास बाळ व आईच्या जीवाला धोका पोहचू शकतो. पायावर सूज येत असेल तर आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
यासारखी लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा त्यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षीत राहण्यास मदत होते.
Read Marathi language article about When to Call the Doctor During Pregnancy? Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.