गर्भावस्था आणि लसीकरण :
गरोदरपणात आवश्यक अशा लसीकरणामुळे गर्भवती स्त्रीचे आणि पोटातील गर्भाचे विविध आजारांपासून संरक्षण होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणाअभावी विविध साथीचे आजार होऊन माता व बालकमृत्यू किंवा जन्मणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणाचे खूप महत्त्व असून यामुळे गरोदर स्त्री आणि गर्भाचे संरक्षण होण्यास मदत होत असते.
गरोदरपणातील लसीकरण –
गर्भवतीने धनुर्वात लसीचे टी.टी. इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. यामुळे आई आणि बाळाचे धनुर्वातापासून बचाव होण्यास मदत होते.
पहिले टी.टी. इंजेक्शन हे चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात घ्यावे व त्यानंतरचे दुसरे टी.टी. इंजेक्शन हे त्यानंतर एक महिन्याने घ्यावे. दुसऱ्या बाळंतपणात एका धनुर्वाताचे इंजेक्शन पुरेसे ठरते.
याशिवाय काही स्त्रीरोगतज्ज्ञ फ्ल्यूची लस घेण्याची शिफारसही करू शकतात. गरोदरपणात फ्लूची लस घेतल्यामुळे आई आणि गर्भाचे फ्लूपासून संरक्षण होते. तसेच बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला काही महिन्यांपर्यंत फ्लू, न्यूमोनिया सारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.
प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या लसी देणे टाळले जाते..?
गर्भावस्थेत गरोदर मातेला हिपॅटायटीस A व B ची लस, गोवर, कांजण्या, एमएमआर लस व नागीण या लसी देणे शक्यतो टाळले जाते.
हे सुद्धा वाचा – गरोदरपणात कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Vaccination during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.