प्रेग्नन्सीमध्ये लोह गोळ्या खाणे का महत्त्वाचे असते ते जाणून घ्या.. (Iron tablets during Pregnancy)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्था आणि लोहाच्या गोळ्या :

गरोदरपणात लोह (iron) खूप महत्त्व असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अनेक गर्भवतीमध्ये अॅनेमिया होण्याची शक्यता अधिक असते. याठिकाणी गर्भावस्थेत गरोदर स्त्रियांनी लोह गोळ्या खाण्याचे महत्त्व सांगितले आहे.

गरोदरपणातील ऍनिमियाची लक्षणे :

ऍनिमियामुळे डोळे, पापण्या व नखे फिक्कट दिसू लागतात. याशिवाय खालील लक्षणेही गर्भवती महिलांमध्ये जाणवतात.
• अशक्तपणा जाणवणे,
• थोडे काम केल्यावरही थकवा येणे,
• छातीत धडधडणे,
• भूक कमी होणे,
• हातापायाला मुंग्या येणे
• चक्कर किंवा भोवळ येणे,
• अंधुक दिसणे,
• डोकेदुखी असे त्रास ऍनिमियामुळे गरोदर स्त्रियांना होऊ शकतात.

गरोदरपणात लोहाच्या गोळ्या का दिल्या जातात..?

अॅनेमिया किंवा रक्तपांढरी (रक्ताल्पता) यामुळे वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे, बाळ दगावणे किंवा बाळाचे वजन कमी असणे अशा समस्या बाळाच्या बाबतीत होऊ शकतात. याशिवाय अॅनेमियामुळे गरोदर स्त्रीला थकवा वाटणे, अशक्तपणा येणे चक्कर येणे असे त्रास होत असतात तसेच अधिक प्रमाणात हिमोग्लोबिन कमी असल्यास तीव्र ऍनिमियामुळे प्रसूतीच्यावेळी अधिक रक्तस्त्राव होऊन आईच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत ऍनिमिया होऊ नये यासाठी प्रेग्नंट महिलांना गरोदरपणात लोहाच्या गोळ्या दिल्या जातात.

अशावेळी तुमचे डॉक्टर तुम्हाला दररोज लोहाची गोळी घ्यायला सांगू शकतात. गर्भावस्थेत गर्भवतीने रोज एक लोहगोळी किमान तीन महिने घेणे आवश्यक असते. डॉक्टरांनी दिलेल्या लोह (iron tablets) व फॉलिक ऍसिडच्या (folic acid) गोळ्या वेळेवर घ्याव्यात. हे तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

लोह वाढण्यासाठी गर्भावस्थेत कोणता आहार घ्यावा..?

रक्तात लोह वाढण्यासाठी आहारातून हिरव्या पालेभाज्या, गुळ, कडधान्याने, मांस, मासे, अंडी असा आहार गर्भवतीने घ्यावा. आहारातील लोह शरीरात शोषण्यासाठी व्हिटॅमिन-C असणारी आवळा, संत्री फळेही खावीत. प्रेग्नन्सीमध्ये रक्तवाढीसाठी कोणता आहार घ्यावा ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

प्रेग्नन्सीत लोह गोळ्या खाण्यामुळे काय दुष्परिणाम होतात..?

लोहाच्या गोळ्यांमुळे बाळावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. जर या गोळ्यांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठता झाल्यासारखे वाटत असल्यास किंवा शौचास काळी होऊ शकते. अशावेळीही काळजी करण्याचे कारण नसते. जर बद्धकोष्ठता होत असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा म्हणजे त्या तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या गोळ्या लिहून देऊ शकतील. मात्र लोह गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये घेणे खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा..

गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Daily iron and folic acid supplements during pregnancy in Marathi.