ठसका लागणे –
बऱ्याचवेळा आपल्याला ठसका लागत असतो. ठसका लागल्यास जीव घुसमटतो, तीव्र खोकला येतो, बैचेन व्हायला होते. घाईगडबडीत भराभर जेवणे, मोठा घास गिळणे किंवा तोंडात घास असताना बोलणे यामुळे ठसका लागत असतो. ठसका लागणे या त्रासाला इंग्लिशमध्ये “Cough after eating” असे म्हणतात.
ठसका का लागतो ..?
जेवत असताना बोलण्यामुळे अन्ननलिकेत अन्न न जाता ते श्वासनलिकेत जाऊ शकते. अशावेळी खोकला येतो व ठसका लागत असतो. ठसका लागणे ही साधी बाब वाटत असली तरीही काहीवेळा जीवावर सुध्दा यामुळे बेतू शकते. कारण जर श्वासनलिकेत अन्न अडकल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. यामुळे ठसका लागल्यास जीव घुसमटत असतो.
तसेच कोरडे पदार्थ खात असताना देखील ठसका लागू शकतो. तसेच तिखट पदार्थाची खाट आल्यामुळेही ठसका लागत असतो. तर खोकल्यामुळे सतत ठसका लागत असतो.
ठसका लागणे यावर घरगुती उपाय –
जेवताना ठसका लागल्यास थोडे पाणी प्यावे. या उपायामुळे अन्ननलिकेतील अन्न हे खाली पोटात सरकते व आराम वाटतो. तसेच पाणी पिण्यामुळे ठसक्याची उबळ देखील कमी होते.
ठसका लागू नये यासाठी काय करावे..?
- ठसका लागू नये यासाठी सावकाश प्रत्येक घास चावून खावा.
- तोंडात अन्नाचा घास असताना बोलू नये.
- पाणी पिताना सुध्दा बोलू नये.
- कोरडे पदार्थ खात असताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. अशी काळजी घेतल्यास वारंवार ठसका लागत नाही.
हे सुध्दा वाचा – उचकी लागणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Cough after eating Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.