Dr Satish Upalkar’s article about dry throat causes and home remedies in Marathi.

घसा कोरडा होणे यावरील उपाय article by Dr Satish Upalkar

घसा कोरडा पडणे – Dry throat :

काहीवेळा घसा कोरडा पडल्याची समस्या होऊ शकते. विशेषतः आजारपणात हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी घसा कोरडा होणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.

घसा कोरडा पडण्याची कारणे –

 • शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे घसा कोरडा पडू शकतो. कारण डिहायड्रेशनमुळे घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण करता होत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडतो.
 • उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण हवामानामुळे देखील घसा कोरडा पडत असतो.
 • तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास त्यामुळेही घसा कोरडा पडू शकतो. कारण तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे घशामधील लाळ व अद्रता सुकते. त्यामुळे घसा कोरडा पडत असतो.
 • सर्दीमुळे नाक गच्च झालेले असल्यास तोंडाने श्वास घ्यावा लागतो. अशावेळीही घसा कोरडा पडत असतो.
 • तापासारख्या आजारात सुद्धा घसा कोरडा पडतो.
 • काहीवेळा ऍलर्जीमुळे देखील घसा कोरडा पडत असतो.
 • स्मोकिंग, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांमुळे सुद्धा घसा कोरडा पडतो.
 • अँटीहिस्टामाइन्स, एंटीडिप्रेससन्ट्स यासारखी औषधे घेण्यामुळेही घसा कोरडा पडू शकतो.

घसा कोरडा पडणे यावरील उपाय :

पुरेसे पाणी प्यावे.
दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिण्यामुळे घसा कोरडा पडत नाही. याशिवाय शहाळ्याचे पाणी, रसदार फळे, लिंबूपाणी, सरबत असे द्रवपदार्थ देखील प्यावेत.

तोंड बंद करूनच झोपावे.
तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे घशामधील लाळ व अद्रता सुकते. त्यामुळे घसा कोरडा पडत असतो. यासाठी तोंड बंद करूनच झोपावे. असे केल्याने घसा कोरडा पडत नाही.

कोमट पाण्यात मध टाकून प्यावे.
घसा कोरडा पडला असल्यास कोमट पाण्यात चमचाभर मध मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे घसा ओलसर राहतो व घसा कोरडा पडत नाही.

काळी मिरी चावून खावी.
घसा कोरडा पडत असेल तर तीन ते चार काळ्या मिरी चावून खाव्यात. यामुळे तोंड व घशामधील लाळग्रंथी क्रियाशील होण्यास मदत होते. या उपायाने घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण होते त्यामुळे घसा कोरडा पडत नाही.

आल्याचा तुकडा चावून खावा.
घसा कोरडा पडला असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे घशामधील इन्फेक्शन देखील कमी होते.

वेलदोडे व खडीसाखर चघळत राहावी.
घसा कोरडा पडल्यास वेलदोडे व खडीसाखर एकत्रित करून चघळत राहावी. यामुळे घशामधील लाळग्रंथी क्रियाशील होऊन घसा कोरडा पडत नाही.

घसा कोरडा पडू नये यासाठी घ्यायची काळजी :

 • पुरेसे पाणी प्यावे.
 • तोंड बंद करूनच झोपावे.
 • तोंडाने श्वास घेणे टाळावे.
 • दररोज दात घासताना तोंडाची स्वछताही करावी.
 • कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
 • स्मोकिंग, तंबाखू, अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – घसा सुजणे यावरील उपाय जाणून घ्या..

In this article information about Dry throat Causes, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *