Dr Satish Upalkar’s article about Swollen Gums or hirdi sujane upay in Marathi.

hirdi sujane upay in Marathi article by Dr Satish Upalkar.

हिरडी सुजणे – Swollen Gums :

काहीवेळा दातांची हिरडी सुजते. हिरडी सुजल्यास त्याठिकाणी अतिशय वेदना होत असतात. अशावेळी ब्रश करताना किंवा अन्न चावताना हिरडीजवळ अतिशय दुखत असते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी हिरडी सुजण्याची कारणे व त्यावरील उपाय याची माहिती सांगितली आहे.

हिरडी सुजणे याची कारणे :

  • हिरडीच्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे हिरडी सुजत असते.
  • दातांवर प्लाक जमल्याने हिरडी सुजते.
  • दात हलत असल्यास त्यामुळेही हिरडीला सूज येऊ शकते.
  • हिरडी जवळ जखम झाल्यामुळे तेथे सूज येते.
  • गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनमधील बदलांमुळे हिरडी सूजत असते.

हिरडी सुजणे यावर घरगुती उपाय –

हिरडी सुजल्यास कोमट पाण्यात साधे मीठ किंवा सैंधव मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरडीला आलेली सूज कमी होते.

हिरडी सुजल्यास दातात लवंग धरून ठेवावी. यामुळे हिरडीतील सूज व वेदना कमी होतात.

आले पेस्ट मध्ये मीठ मिसळून ती पेस्ट सूज आलेल्या हिरडीवर लावावी. दहा मिनिटांनी चूळ भरून तोंड धुवावे. यामुळे हिरडीची सूज कमी होते.

हिरडी सुजल्यास तेथे थोडासा बेकिंग सोडा लावावा. या घरगुती उपायाने हिरडीची सूज कमी होते.

हिरडी सुजल्यास तेथे कोरपडीचा गर लावावा. यामुळे हिरडीतील सूज व वेदना कमी होतात.

मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून त्याचा लेप सुजलेल्या सुजलेल्या हिरडीवर लावावा. यामुळेही हिरडीची सूज कमी होते.

दातांची व हिरडीची घ्यायची काळजी –

  • तोंडाची स्वच्छता ठेवा. यासाठी नियमित दात घासावेत.
  • सकाळी व रात्री असे दोनदा दात घासावेत.
  • दात घासताना हिरडीला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
  • तंबाखू, पानमसाला, गुटखा, धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
  • घरगुती उपायांनी हिरडीची सूज व वेदना कमी न झाल्यास डेटींस्टकडे जावे.
[adinserter block=”5″]

हे सुध्दा वाचा – हिरडी मजबूत करण्याचे उपाय जाणून घ्या..

In this article information about Swollen Gums or hirdi sujane causes and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

Dr. Satish Upalkar

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *