ताडगोळे (Ice apples / tadgola) –
ताडगोळे हे एक चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे जे उन्हाळ्यात मिळते. ते अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि त्यात भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
ताडगोळे खाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पित्त आणि आम्लपित्त कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताडगोळे खाण्यामुळे पोट साफ होते, पोटात गॅस होत नाही. त्वचा निरोगी राहते. रक्तदाब व कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. वजन आटोक्यात राहते. लघवीची जळजळ कमी होते. असे विविध फायदे ताडगोळे खाण्यामुळे होतात.
ताडगोळे खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
1) ताडगोळे खाण्यामुळे पित्त कमी होते.
ताडगोळे हे पित्त आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मळमळ आणि उलट्या कमी होतात.
2) ताडगोळे डिहायड्रेशन पासून वाचवते.
ताडगोळे हे अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि उन्हाळ्यात शरीराला आवश्यक द्रव पदार्थ देण्यास मदत करते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
3) ताडगोळे खाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
ताडगोळे हे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स हे शरीराला फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
4) ताडगोळे खाण्यामुळे पचनसंस्था सुधारते.
ताडगोळे हे फायबरचा चांगला स्रोत आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. ताडगोळे खाल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या पचन समस्या दूर होतात. यामुळे पोट साफ होते तसेच मुळव्याधचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.
5) ताडगोळे खाण्यामुळे त्वचा निरोगी राहते.
ताडगोळेमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान कमी करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होऊन त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत.
6) ताडगोळे खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
ताडगोळेमध्ये पोटॅशियम भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर चा त्रास आहे त्यांनी हे फळ जरूर खावे. रक्तदाब नियंत्रित राहिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ताडगोळे उपयुक्त असते.
7) ताडगोळे कॅन्सरचा धोका कमी करते.
ताडगोळेमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखतात तसेच शरीराला फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवून कॅन्सरचा धोका कमी करतात.
8) ताडगोळे डायबेटिसमध्ये उपयुक्त असते.
ताडगोळे हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि डायबेटिस यांसारख्या समस्या टाळण्यास मदत करते. ताडगोळेमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ते डायबिटीज नियंत्रित करण्यास मदत करते. ताडगोळे खाल्ल्याने रक्तातील साखरची पातळी स्थिर राहते.ज्यांना डायबेटिस आहे त्यांनी जरूर हे फळ खावे.
9) ताडगोळे खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
ताडगोळे फळात कॅलरीज कमी असतात तर फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे भूक नियंत्रित होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
10) ताडगोळे खाण्यामुळे लघवीच्या समस्या कमी होतात.
ताडगोळे हे लघवीच्या समस्या कमी करण्यास मदत करते आणि मूत्रमार्गाच्या संक्रमणापासून (UTI) संरक्षण करते.
ताडगोळे कसे खावे..?
तुम्ही ताजे ताडगोळे फळ खाऊ शकता. तसेच याचा रस करून देखील पिऊ शकता. काही पाककृतीमध्ये देखील ते वापरले जाते.
ताडगोळे खाण्याचे तोटे –
जास्त प्रमाणात ताडगोळे खाल्यास पोटदुखी, अपचन, पोटात गॅस होणे, उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. विशेषतः ताडगोळे कच्चे खाल्ल्याने जास्त त्रास होतो. यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. तसेच जास्त प्रमाणात ताडगोळे खाण्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे ताडगोळे हे प्रमाणातच खाल्ले पाहिजे.
हे सुध्दा वाचा – फणस खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Ice apples or tadgola benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.