सोनोग्राफी तपासणी म्हणजे काय (Ultrasound Sonography) :
अल्ट्रासाऊंड स्कॅन ही एक वैद्यकीय तपासणी आहे. यामध्ये हाय-फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरींचा वापर करून आपल्या शरीराच्या आतील अवयवांची स्थिती कॉम्प्युटरवर images स्वरुपात तपासली जाते.
इतर स्कॅनिंग तपासणीप्रमाणे, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये रेडिएशनचा वापर केला जात नाही. त्यामुळे सोनोग्राफी तपासणी ही सुरक्षित असते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान गर्भाची स्थिती पाहण्यासाठी सोनोग्राफी तपासणीचा वापर केला जातो.
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचा वापर कधी व कशासाठी करतात – (Sonography Uses) :
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचा वापर प्रामुख्याने गरोदरपणात पोटातील गर्भाची स्थिची पाहण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त विविध आजारांच्या निदानासाठी अंगअवयवांची स्थिती तपासण्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो.
यामध्ये पोट, मूत्राशय, किडनी, लिव्हर, पित्ताशय, अंडाशय, स्वादुपिंड, प्लीहा, थायरॉईड, अंडकोष, गर्भाशय यासारख्या अवयवांची तपासणी सोनोग्राफीद्वारे आपले डॉक्टर करू शकतात. सोनोग्राफीद्वारे पोट आणि ओटीपोटाचा आतील भाग बघितला जातो. कधी कधी एखादी गाठ असल्यास, किडनी स्टोन असल्यास सोनोग्राफीद्वारे स्पष्ट होते.
अल्ट्रासाऊंडच हे तंत्र खूपच सुरक्षित असल्यामुळे हे स्त्री रोगासंबंधीत प्रॉब्लेम्ससाठी खूप व्हॅल्युएबल आहे. याशिवाय गर्भावस्थेमध्ये गर्भाची वाढ तपासण्यासाठी उपयोगी ठरते. अल्ट्रासाऊंडने मानेचे, थॉयराईडचे रोग यांचेही निदान होते.
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करण्यापूर्वी तयारी कशी करावी..?
सोनोग्राफी करण्यापूर्वी आपले डॉक्टर आपणास काही सूचना देऊ शकतात. जसे पोटासंबंधी समस्येमध्ये सोनोग्राफी स्कॅन करताना तपासणीपूर्वी आठ ते दहा तास उपाशी राहण्याच्या सूचना ते देऊ शकतात. त्याचप्रमाणे पित्ताशय, यकृत, स्वादुपिंड किंवा प्लीहाच्या चाचणीच्या आधी तेलकट व फॅटयुक्त पदार्थ न खाण्याच्या सूचना ते देतील. तसेच तपासणीपूर्वी आपल्या डॉक्टरांना तुम्ही सध्या घेत असलेल्या औषधांची माहिती जरूर सांगा.
सोनोग्राफी तपासणी कशी करतात ..?
सोनोग्राफी करताना बेडवर झोपवले जाते. त्यानंतर ज्या भागाची तपासणी करायची आहे तेथे विशिष्ट प्रकारचे जेल लावले जाते. त्यानंतर तेथे अल्ट्रासाऊंड ट्रान्सड्यूसर थोडा दाब देऊन फिरवले जाते. त्या ट्रान्सड्यूसरमधून उच्च-वारंवारतेच्या ध्वनी लहरी अवयवाकडे पाठवल्या जातात. त्यानंतर त्या ध्वनी अवयवांना थडकून पुन्हा मागे येतात. त्या प्रतिध्वनीद्वारे कॉम्प्युटरमध्ये संबंधित अवयवांची स्थिती दर्शवणारी image दिसू लागते. सोनोग्राफी तपासणीसाठी साधारण 30 मिनिटे लागू शकतात. तपासणीनंतर सोनोग्राफी स्कॅनिंग रिपोर्ट दिले जातात.
सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी किती खर्च येतो..?
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक अशा सर्वच भागात सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी साधारण 1000 ते 2500 पर्यंत खर्च येऊ शकतो.
सोनोग्राफी तपासणी सुरक्षित असते का..?
एक्स-रे सारख्या स्कैनिंग तापसण्यामध्ये रेडिएशनचा वापर करावा लागतो. मात्र अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये रेडिएशनचा वापर करावा लागत नाही. यामध्ये ध्वनी-लहरींचा वापर केला जातो. त्यामुळे सोनोग्राफी तपासणी ही जास्त सुरक्षित असते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान गर्भाशयातील नाजूक अशा गर्भाची तपासणी करण्यासाठी सोनोग्राफीचा वापर केला जातो. तसेच सोनोग्राफी तपासणी केल्यानंतर कोणतेही विपरीत परिणाम (side effects) होत नाहीत.
हे सुद्धा वाचा -> प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी तपासणी कधी करावी ते जाणून घ्या.
Pelvic सोनोग्राफी – Pelvic Sonograpphy ) :
यामध्ये सोनोग्राफीचा वापर करून नितंब किंवा ओटीपोटातील (pelvis भागातील) तपासणी केली जाते. ह्या अल्ट्रासाऊंड तपासणीला Transabdominal सोनोग्राफी, Pelvic सोनोग्राफी, abdomen pelvis sonography किंवा Gynecologic अल्ट्रासाऊंड ह्या नावानेही ओळखले जाते.
Pelvic सोनोग्राफी तपासणीद्वारे स्त्रियांमध्ये गर्भावस्था, गर्भाची वाढ तपासणे याबरोबरच गर्भाशय, गर्भाशयमुख (सर्विक्स), Fallopian tubes, Ovaries, योनी व मूत्राशय या जननअवयवांची तपासणी केली जाते. तर पुरुषांमध्ये मूत्राशय व प्रोस्टेटची तपासणी Pelvis Sonograpphy द्वारे करतात.
Read Marathi language article about Ultrasound Sonography.