अंगावर पुरळ उटणे – Skin rashes :
काहीवेळा अंगावर पुरळ येत असतात. यावेळी त्वचेवर बारीक, लालसर किंवा इतर रंगाचे फोड येत असतात. त्यामुळे त्याठिकाणी खाज येत असते.
कांजिण्या, गोवर, नागीण अशा अनेक रोगांमध्ये पुरळ उठणे हे लक्षण असू शकते. तसेच पुरळाचे अनेक प्रकारही असू शकतात.
अंगावर पुरळ येण्याची कारणे (causes) :
इन्फेक्शन हे प्रमुख कारण आहे. पुरळ हे खालील रोगांमध्ये जंतुसंसर्गमुळे अंगावर उठतात.
• विषाणूजन्य आजार जसे गोवर, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण यांमुळे,
• जिवाणूजन्य आजार जसे इंपेटिगो, स्कार्लेट फीवर यांमुळे,
• बुरशीजन्य आजार गजकर्ण, नायटा इ.,
• अॅलर्जीमूळे
• औषधांच्या साईड इफेक्टमुळे,
• कीटकदंश,
• काही विशिष्ट वनस्पती, प्रदूषण, केमिकल्स यांचेशी संपर्क आल्यानेदेखील पुरळ उठते.
तसेच ल्युपस, डरमॅटोमायोसायटिस इ. काही गंभीर आजारांमध्येही त्वचेवर पुरळ येत असते.
पुरळाचे निदान असे केले जाते :
पुरळाचे निदान त्याचे स्वरूप आणि लक्षणे यावरून करतात. याशिवाय काहीवेळा ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करावी लागू शकते.
अंगावर पुरळ होऊ नयेत यासाठी अशी घ्यावी काळजी ;
• इन्फेक्शन होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.
• वैयक्तिक स्वच्छता ठेवावी.
• अॅलर्जी असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहावे.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नेहमी औषधे घ्या. शक्यतो घरगुती उपाय करणे टाळावा.
हे सुद्धा वाचा..
• अंगावर पित्त उठणे
• कांजिण्या (Chicken pox)
• गोवर
Read Marathi language article about Skin rashes causes and home remedies. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.