संडासच्या जागी कोंब येणे –
प्रामुख्याने मूळव्याधमध्ये संडासच्या जागी कोंब येतात. याशिवाय तिखट, मसालेदार व उष्ण पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, बद्धकोष्ठता यामुळेही काहीवेळा संडासच्या जागी बारीक कोंब येऊ शकतात.
संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय –
मूळव्याधमुळे संडासच्या जागी कोंब आल्यास तेथे किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट लावावी.
मुळव्याधचे कोंब असल्यास, 1 चमचा मोहरी आणि 2 चमचे दूध यांची बारीक पेस्ट करून ती दिवसातून दोनदा कोंबावर लावावी.
मूळव्याधमुळे संडासच्या जागी कोंब आल्याने सूज येऊन दुखत असल्यास तेथे बर्फाचा शेक द्यावा.
वेळीच काळजी घ्या..
बऱ्याचदा तिखट, मसालेदार व उष्ण पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी कोंब येतात. अशावेळी योग्य काळजी न घेतल्यास पुढे मूळव्याधचा त्रास सुरू होऊ शकतो.
अशावेळी काहीदिवस तिखट, मसालेदार पदार्थ, मांसाहार खाणे टाळावे. वरण भातात तूप घालून खावे. हिरव्या पालेभाज्या, फळे खावीत. संडासच्या जागी खाजवणे टाळावे. अशी काळजी घेतल्यास एक दोन दिवसात संडासच्या जागी आलेले बारीक कोंब कमी होतात.
हे सुध्दा वाचा – संडास जागी खाज सुटण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.