पोटात मुरडा येणे म्हणजे काय ..?

अनेक कारणांनी पोटात मुरडा मारून यतो. यावेळी पोटात अतिशय वेदना होऊन पातळ शौचास होते. अपचन तसेच पोटातील बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन यामुळे पोटात मुरडा मारून येतो.

पोटाला मुरडा येणे याची कारणे –

  • पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने पोटाला मुरडा मारून येतो,
  • अन्नातून विषबाधा झाल्यानेही पोटाला मुरडा मारून येतो.
  • दुधाचे पदार्थ पचत नसल्यास lactose intolerance मुळे,
  • ग्लूटेन युक्त असणारे पचत नसल्यास त्यामुळेही पोटाला मुरडा मारून येतो.
  • पचनसंस्थेत बॅक्टेरिया, कृमी किंवा व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यामुळे पोटात मुरडा मारतो.
  • जुलाब, अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड, उलट्या, Irritable bowel syndrome, IBD ह्यासारख्या आजारांमुळे पोटाला मुरडा येतो.
  • अपेंडीक्सला सूज आल्यामुळे पोटाला मुरडा येऊ शकतो.
  • मानसिक तणाव किंवा भीतीमुळे,
  • काही विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे पोटाला मुरडा मारून येऊ शकतो.
  • स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गरोदरपण यामुळे पोटाला मुरडा मारून वेदना होऊ शकतात.

पोटात मुरडा येणे यामधील लक्षणे –

  • पोटात मुरडा मारून अतिशय वेदना होतात हे यातील प्रमुख लक्षण असते. याशिवाय,
  • पातळ शौचास होणे,
  • मळमळ होणे,
  • उलट्या होणे, यासारखी लक्षणे यामध्ये जाणवू शकतात.

कोणती लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ..?

पोटाला मुरडा येणे याबरोबरच जर खालील त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

  • वारंवार पोटाला मुरडा मारून पोट दुखत असल्यास,
  • जुलाब लागल्यास,
  • शौचातून रक्त येत असल्यास,
  • भरपूर प्रमाणात उलट्या होत असल्यास,
  • उलटीतून रक्त येत असल्यास,
  • ताप आल्यास,
  • तहान अधिक लागून डोळे, तोंड कोरडे पडत असल्यास,
  • झटके येत असल्यास,
  • पोटावर सूज आल्यासारखे वाटल्यास,
  • श्वास घेताना त्रास होत असल्यास,
  • डोळे, त्वचा पिवळसर रंगाची झाल्यास,

अशावेळी पोटाला मुरडा मारून येणे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे तातडीने जाणे आवश्यक आहे.

पोटात मुरडा येणे याचे निदान कसे केले जाते ..?-

रुग्णाची शारीरिक तपासणी, लक्षणे, आहार हिस्ट्री यांच्या आधारे पोटाला मुरडा येणे याचे निदान डॉक्टर करू शकतात. तसेच अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एक्स-रे, MRI स्कॅन अशा तपासण्या कराव्या लागू शकतात. याशिवाय रक्त, लघवीची चाचणी सुद्धा करावी लागू शकते.

पोटात मुरडा येणे यावरील उपचार –

पोटात नेमका कशामुळे मुरडा मारून वेदना होत आहेत याच्य्या कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. जसे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने पोटाला मुरडा येत असल्यास त्यावेळी डॉक्टर, antibiotics औषधे देतील. तसेच पोटातील वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातील.

पोटात मुरडा येणे यावर घरगुती उपाय –

  • पोटात मुरडा आल्यास अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
  • गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पोटाला मुरडा येणे थांबते.
  • पोटात मुरडा आल्यास गरम पाण्यात चिमुटभर हिंग व सैंधव मीठ घालून ते पाणी प्यावे.
  • पोटात मुरडा आल्यास आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
  • पोटात मुरडा आल्यास पोटावर गरम शेक घ्यावा. हे घरगुती उपाय पोटाला मुरडा येणे यावर उपयोगी ठरतात.

जर आहारामुळे अपचन होऊन पोटाला मुरडा मारून पोट दुखत असल्यास वरील घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटाला मुरडा मारून येत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

हे सुध्दा वाचा –
पोटात गॅस होणे यावरील उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Stomach ache Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *