Dr Satish Upalkar’s article about Hemorrhoids or Piles types in Marathi.
मुळव्याध – Piles :
अनेकजणांना मुळव्याधचा त्रास होत असतो. मुळव्याध ही गुदभागाची समस्या असून यामध्ये गुद भागातील शिरा सुजतात, त्याठिकाणी वेदना, खाज व जळजळही होत असते. तसेच काहीवेळेस मुळव्याधीत मलावाटे रक्तही जात असते. मुळव्याधाचे प्रकार आणि त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
मुळव्याधाची कारणे :
वेळी अवेळी जेवणे, पचनास जड असणारे पदार्थ सतत खाणे, बद्धकोष्ठता, तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बैठे काम, अनुवंशिकता, वाढलेले वजन ही मुळव्याधची प्रमुख कारणे आहेत.
बद्धकोष्ठता (constipation) होणाऱ्या व्यक्तींना शौचाला खडा धरण्याचा त्रास असल्यास मुळव्याध होण्याची शक्यता अधिक असते. कारण शौचाला खडा होण्यामुळे शौचाच्या वेळी गुदाच्या ठिकाणी अधिक ताण येतो. त्याचप्रमाणे प्रेग्नसीमध्येही काही स्त्रियांना मुळव्याध होण्याची अधिक शक्यता असते. गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतामुळे तसेच डिलिव्हरीच्या वेळेस जास्त जोर द्यावा लागल्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता असते.
आहारातील तंतुमय पदार्थांच्या कमतरतेमुळे व चुकीचा आहार घेण्याची सवय असल्यास हा त्रास अधिक प्रमाणात होतो. चुकीचा आहार म्हणजे, जास्त तिखट, खारट व मसालेदार पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, चिकन, अंडी, फास्टफूड, जंकफूड सतत खाण्याच्या सवयी मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरतात.
मुळव्याधाची लक्षणे :
मुळव्याध हा गुदभागाचा आजार असल्याने गुदभागी मुळव्याधाची लक्षणे जाणवतात. यामध्ये गुदाच्या ठिकाणी कोंब येणे व मांसल गाठ येणे, त्याठिकाणी वेदना होणे. गुदाच्या ठिकाणी खाज, आग आणि जळजळ होणे तसेच काहीवेळा गुदावाटे रक्त जाणे अशी लक्षणे मुळव्याधीत असतात.
मुळव्याधाचे प्रकार – Types of Hemorrhoids in Marathi :
मुळव्याधाचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार असतात.
1) अंतर्गत मुळव्याध (Internal Hemorrhoid)
2) बाह्य मुळव्याध (External Hemorrhoid)
1) अंतर्गत मुळव्याध – Internal Hemorrhoid :
अंतर्गत मुळव्याध या प्रकारात मुळव्याध ही गुदाच्या आतील बाजूस होत असते. यामुळे गुदाच्या आत मुळव्याध कोंब येतात व आतील शिरा सूजलेल्या असतात. ह्यामुळे गुदाच्या ठिकाणी वेदना होते, खाज व आग होते, मुळव्याध कोंब येतात तसेच काहीवेळा toilet च्या वेळी रक्त पडत असते. अशी लक्षणे ह्या प्रकारच्या मुळव्याधमध्ये असतात.
आणि जर गुदाच्या आत असणारे मुळव्याध कोंब हे बाहेर आलेले असल्यास त्या प्रकारास Prolapsed Hemorrhoid असे म्हणतात. Prolapsed Hemorrhoid या प्रकाराचे पुन्हा 4 ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते.
पहिली ग्रेड – Grade one :
यामध्ये गुदाच्या आत असणारे कोंब बाहेर येत नाहीत. तसेच यात रक्त येऊ शकते.
दुसरी ग्रेड – Grade two :
यामध्ये शौचाच्यावेळी गुदाच्या आत असणारे कोंब बाहेर येतात आणि आपोआप पुन्हा आत जातात.
तिसरी ग्रेड – Grade three :
यामध्ये शौचाच्यावेळी कोंब बाहेर येतात मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.
चौथी ग्रेड – Grade four :
यामध्ये आतील कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाहीत. तसेच ते कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात.
2) बाह्य मुळव्याध – External Hemorrhoid :
बाह्य मुळव्याध ह्या प्रकारात मुळव्याधचे कोंब गुदाच्या बाहेरच्या बाजूस येतात. तसेच हे कोंब सुजलेले व वेदना असणारे असतात. या प्रकारच्या मुळव्याध मध्येही गुदभागी वेदना होणे, आग व खाज होणे अशी लक्षणे असतात.
याखेरीज मुळव्याधमध्ये गुदाजवळील टिश्यूज मध्ये रक्त गोठून thrombosis ची स्थिती निर्माण होऊ शकते. या प्रकारच्या मुळव्याधला thrombosed hemorrhoids असे म्हणतात. ह्या स्थितीमध्ये मुळव्याधच्या ठिकाणी अतिशय वेदना होते, तेथे खाज व आग होणे तसेच मुळव्याधच्या ठिकाणी निळसर झालेला आढळतो. अशी लक्षणे दिसून आल्यास त्यावर तात्काळ डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक आहे. कारण thrombosed hemorrhoids ही धोकादायक स्थिती असते.
आयुर्वेदनुसार मुळव्याधाचे प्रकार :
आयुर्वेदात मुळव्याधचे ‘शुष्क अर्श’ आणि ‘रक्तार्श’ असे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. ज्या मुळव्याधमध्ये कोंब येणे, खाज, आग व वेदना होणे अशी लक्षणे असतात मात्र त्यातून रक्त जात नाही त्या मुळव्याध प्रकाराला ‘शुष्क अर्श’ असे म्हणतात. तर मुळव्याधच्या त्रासात जेंव्हा रक्त जात असते तेंव्हा त्या प्रकाराला ‘रक्तार्श’ असे म्हणतात.
हे सुध्दा वाचा – मुळव्याधमध्ये काय खावे व काय खाऊ नये ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
गुदाच्या आत असणाऱ्या internal piles चे निदान करण्यासाठी digital rectal examination (DRE) किंवा proctoscope यांचा उपयोग केला जातो. याशिवाय काहीवेळा colonoscopy करण्याचीही आवश्यकता असू शकते. रुग्णाला जाणवणारे त्रास व शारीरिक तपासणी याद्वारे मुळव्याधचा कोणता प्रकार आहे याचे निदान आपले डॉक्टर करतील.
मुळव्याधाचे काही उपाय :
- सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाल्यास मुळव्याध लवकर बरी होण्यास मदत होते.
- मुळव्याधीत चमचाभर जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. हा उपाय मुळव्याधमध्ये उपयुक्त आहे.
- मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे.
- मुळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी.
- पोट साफ होत नसल्यास चमचाभर साजूक तूप झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट पाण्यातून घ्यावे.
हे सुध्दा वाचा – मुळव्याधवरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मुळव्याधाचे वरील सर्व प्रकारांचा विचार करता, Prolapsed hemorrhoid आणि Thrombosed hemorrhoids ह्या दोन प्रकारात दुर्लक्ष करू नये. यावर वेळीच डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. अशाप्रकारे मुळव्याध चे प्रकार कोणते आहेत व त्यावरील उपाय यांची सविस्तर माहिती याठिकाणी दिली आहे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
- https://wellness.ucsd.edu/studenthealth/documents/brochures/hemorrhoids.pdf
- https://www.health.harvard.edu/diseases-and-conditions/hemorrhoids_and_what_to_do_about_them
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/hemorrhoids/symptoms-causes/syc-20360268
- https://www.aafp.org/afp/2002/0415/p1629.html
In this article information about Types of Piles in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.