Dr Satish Upalkar’s article about Pitta and Headache in Marathi.

पित्त व डोकेदुखी यावरील उपाय यांची माहिती

पित्त व डोकेदुखी –

अनेकांना पित्त आणि डोकेदुखी यांचा त्रास वारंवार होत असतो. सतत तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ खाणे, अधिक प्रमाणात चहा-कॉफी पिणे, अपुरी झोप, मानसिक ताण, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास होऊ लागतो.

अशा वाढलेल्या पित्तामुळे मग डोकेदुखी सुरू होते. यासाठी येथे पित्तामुळे होणारी डोकेदुखी व त्यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी खाली दिली आहे.

पित्तामुळे डोकेदुखी होण्याची कारणे –

  • तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे,
  • वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,
  • उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याची सवय,
  • तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारखी व्यसने करणे,
  • मानसिक तणाव, राग यांमुळे,
  • वरचेवर डोकेदुखीच्या किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेत राहिल्यामुळे [4],
  • अपुरी झोप किंवा अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.

अशावेळी पित्त वाढते व त्यामुळे डोकेदुखी, ऍसिडिटी, छातीत जळजळ होणे, अल्सर यासारखे त्रास होऊ लागतात.

पित्त डोकेदुखी यावर घरगुती उपाय –

  • पित्तामुळे डोकेदुखी होत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा.
  • वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही पित्त डोकेदुखी कमी होण्यासाठी मदत होते.
  • पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास काही वेळ झोप घ्यावी. यामुळेही आराम मिळून डोकेदुखी थांबते.
  • पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास पुरेसे पाणी प्यावे. शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोकेदुखी होऊ शकते तसेच पाण्यामुळे पित्तही कमी होण्यास मदत होते.
  • कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही पित्तामुळे होणारी डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते.

असे घरगुती उपाय पित्त व डोकेदुखी यावर उपयोगी ठरतात.

हे सुध्दा वाचा – अर्धे डोके दुखणे याची कारणे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

वारंवार पित्त आणि डोकेदुखी होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –

  • संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
  • वेळेवर जेवण घ्या. अधिक वेळ उपाशी राहू नका.
  • ‎दिवसभरात पुरेसे पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लास पाणी प्यावे.
  • दररोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे.
  • ‎मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
  • ‎चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
  • ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
  • ‎जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
  • नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
  • ‎मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
  • ‎तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
  • ‎वारंवार डोकेदुखी होत असल्यास उठसुठ वेदनाशामक गोळ्या घेणे टाळा.

अशी काळजी घेतल्यास पित्ताचा त्रास आणि डोकेदुखी होणार नाही.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – अंगावर पित्त उठणे याची कारणे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

4 Sources

In this article information about Pitta Headache treatment & home remedies in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...