संडास साफ न होणे –
बऱ्याचजणांना संडासला साफ होत नाही. मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाणे, बैठी जीवनशैली, फळे व भाज्या कमी खाणे, पाणी कमी पिणे अशा विविध कारणांनी संडासला साफ होत नाही.
संडासला साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध –
यासाठी त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक औषध खूप उपयोगी पडते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. यामुळे सकाळी संडासला साफ होण्यास मदत होते.
संडास साफ होण्यासाठी औषध गोळी –
संडासला साफ होण्यासाठी Zandu Nityam tablet ही आयुर्वेदिक औषध गोळी उपयोगी पडते. संडास साफ होत नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक गोळी कोमट पाण्याबरोबर घ्यावी.
संडासला साफ होण्यासाठी घ्यायची काळजी –
- मैद्याचे पदार्थ, मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावा.
- जेवणानंतर लगेच झोपू नये.
- बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा.
अशी काळजी घेतल्यास रोजच्या रोज संडासला साफ होण्यासाठी मदत होते.
हे सुध्दा वाचा – पोटात गॅस होणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Ayurvedic medicine and tablet for Constipation. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.