रांजणवाडीत डोळ्यांच्या पापणीला बारीक फोड किंवा पुळी येत असते. सर्वचं वयोगटातील लोकांच्या डोळ्यात ही समस्या उद्भवू शकते. फोड आलेल्या पापणीच्या ठिकाणी वेदना, सूज येणे, जळजळ, खाज सुटणे आणि वारंवार अश्रू येण्याची समस्या होऊ शकते.
साधारण एका आठवड्यात हा आजार बरा होत असतो. याठिकाणी रांजणवाडीवरील औषधाची माहिती सांगितली आहे.
रांजणवाडी चे औषध :
रांजणवाडी हा त्रास प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत असतो. त्यामुळे या त्रासासाठी एंटीबैक्टीरियल क्रीम (antibiotic ointments) रांजणवाडीवर लावावी. तर वेदना कमी करण्यासाठी acetaminophen किंवा ibuprofen हे घटक असणाऱ्या गोळ्या औषधे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.
कोणती काळजी घ्यावी..?
रांजणवाडीची पुळी बोटाने दाबून फोडू नये. कारण असे करण्याने त्याठिकाणी जखम होऊ शकते तसेच तेथील बॅक्टेरियल इन्फेक्शन इतर ठिकाणीही पसरण्याची व त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.
रांजणवाडीमध्ये काय करावे..?
• एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा.
• लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा.
• किसलेला बटाटाही रांजणवाडीच्या ठिकाणी लावू शकता.
• लसूण पाकळीचा तुकडा करून तो रांजणवाडीवर लावावा.