सोरायसिस (Psoriasis) –
सोरायसिस हा एक त्वचाविकार आहे. या विकारात त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होत असते. त्यामुळे त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे व पापुद्रे निघत असतात. जेनेटिक आणि इम्यून सिस्टीम संबंधित कारणांमुळे सोरायसिस होत असतो. पाठ, हात, कोपर, पाय, गुडघा, मान व डोके अशा ठिकाणी सोरायसिस अधिक प्रमाणात होत असतो.
या त्रासात त्वचेवर लालसर, सुज असणारे व खाजयुक्त चट्टे येतात. यामुळे त्वचेची आग होते, त्वचा कोरडी पडते. तसेच त्वचेवर खाजवल्यास कोंडा होऊन पापुद्रे निघत असतात. असे त्रास सोरायसिस मध्ये होतात.
सोरायसिस वरील घरगुती उपाय –
सोरायसिस असल्यास त्वचेला खोबरेल तेलाने मालिश केल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. सोरायसिसचा त्रास असल्यास अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी. त्याचप्रमाणे सैंधव मीठ मिसळलेल्या पाण्याने देखील अंघोळ करू शकता. कडुनिंबाचे तेल सोरायसिसच्या चकत्यांवर लावल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय सोरायसिस त्रासावर उपयोगी पडतात.
सोरायसिसचा त्रास असल्यास हे करावे..
(1) सोरायसिस असल्यास त्वचेवर खोबरेल तेलाने मालिश करावी. यामुळे त्वचेतील कोरडेपणा निघून जातो व त्रास कमी होण्यास मदत होते.
(2) सोरायसिस चा त्रास असल्यास अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी.
(3) डोक्यात सोरायसिस असल्यास तेथे कोरफडीचा गर लावून हलकी मालिश करावी.
(4) सोरायसिस असल्यास त्वचेवर हळदीचा लेप लावावा.
(5) अंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी.
(6) कडुनिंबाचे तेल कापसाच्या बोळ्याने सोरायसिसच्या चकत्यांवर लावावे. यामुळेही सोरायसिसचा त्रास कमी होतो.
सोरायसिसच्या रुग्णांनी घ्यायची काळजी –
- जास्त तिखट, खारट व चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे.
- मानसिक ताण तणावापासून दूर राहावे.
- त्वचेवर इजा किंवा जखमा होणार नाही याची काळजी घ्या.
- तंबाखू, स्मोकिंग, अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- सुती, सैल व मऊ असणारी वस्त्रे वापरावीत.
- अंघोळीसाठी सौम्य साबण वापरावा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेणे टाळावे.
हे सुध्दा वाचा – सोरायसिसची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about Psoriasis Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.