गरोदरपणात कोणती औषधे घ्यावीत, कोणती औषधे घेऊ नयेत याची माहिती जाणून घ्या.. (Pregnancy and medicines)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्था आणि औषधे (Pregnancy and medicines) :

गरोदरपणात गर्भाशयात बाळ वाढत असतो. अशावेळी काही औषधे गरोदरपणी टाळणे आवश्यक असतात. कारण त्या औषधांमुळे गर्भाच्या जीवास धोका पोहचण्याची शक्यता असते. यासाठी येथे गर्भावस्थेत गरोदर महिलांनी औषधे घेताना काय काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली आहे.

गरोदरपणात गर्भवती स्त्रियांनी औषधे घेताना अशी घ्यावी काळजी :

डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं औषधे घ्या..
गरोदरपणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही परस्पर औषध घेऊ नये. तुम्ही जर गरोदर असाल आणि तुम्हाला ताप येणे, खोकला, सर्दी, उलट्या होणे, जुलाब, पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, हाय ब्लडप्रेशर असे कोणतेही त्रास होत असल्यास त्यावर स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेऊ नका. आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून प्रेग्नन्सीमधील योग्य व सुरक्षित अशी औषधे घ्यावीत.

सध्या घेत असलेल्या औषधांची माहिती डॉक्टरांना द्या..
प्रेग्नंट होण्यापूर्वी जर आपणास एखादा आजार किंवा आरोग्य समस्या असल्यास व त्यावरील औषध सुरू असल्यास त्याविषयी डॉक्टरांना सांगावे. कारण अशा औषधांचा साईड-ईफेक्ट पोटातील गर्भावर होण्याचीही अधिक शक्यता असते.

अशी औषधे घेणे टाळा..
गर्भवतींनी अॅलर्जी असणारी किंवा एक्सपायरी तारीख निघून गेलेली (एक्सपायर) औषधे चुकूनही घेऊ नयेत. तसेच कोणतेही हर्बल मेडिसिन म्हणजे नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या..
प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांकडून दिलेली लोह, कॅल्शियम फॉलिक ऍसिड किंवा इतर औषधे वेळेवर तसेच दिलेल्या प्रमाणात घ्यावीत. कोणतीही चुकीची समजूत बाळगून औषधांची टाळाटाळ करू नये. गरोदरपणात हाय ब्लडप्रेशर किंवा डायबेटीसचा त्रास असल्यास त्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधेही वेळेवर घ्यावीत.

हे सुद्धा वाचा..

गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Medicines effects and side effects during Pregnancy information in Marathi.