पोटात कालवणे –
खाल्लेले अन्न योग्यरीत्या न पचल्यास अपचन झाल्याने पोटात कालवल्यासारखे होते. यावेळी पोट बिघडल्याने पोटात अस्वस्थ वाटू लागते. यामुळे मळमळ आणि पातळ शौचास देखील होते.
पोटात कालवणे यावरील उपाय :
पोटात कालवून आल्यास शौचास जाऊन यावे. यामुळे लगेच बरे वाटेल. पोटात कालवल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा, जिरे आणि सैंधव मीठ मिसळून ते पाणी प्यावे. पोटात कालवल्यास आल्याचा छोटासा तुकडा सैंधव मिठाबरोबर खावा. हे उपाय पोटात कालवणे यावर उपयोगी पडतात.
पोटात कालवल्यास घ्यायची काळजी –
- पचनास हलका असा आहार घ्यावा.
- वरण भातात तूप घालून खावे.
- तळलेले, मसालेदार पदार्थ, मांसाहार, अर्धवट शिजलेले अन्न, हरभरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी पदार्थ खाणे टाळावे.
- वेळेवर शौचास जावे. अशी काळजी यावेळी घ्यावी.
हे सुध्दा वाचा – अपचन होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.