पोट गच्च होणे –
काहीवेळा पोट गच्च होऊन अस्वस्थ वाटू लागते. विशेषत: भरपेट जेवण जेवल्यावर हा त्रास होऊ शकतो. पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे, पोटातील गॅस ह्यामुळे हा त्रास होऊ शकतो.
पोट गच्च होण्याची कारणे –
भरपेट जेवल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटत असते. तसेच पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे, पोटातील गॅस आणि पोट साफ न होणे अशा कारणांनी पोट गच्च होत असते.
पोट गच्च होणे यावर घरगुती उपाय –
पोट गच्च झाल्यास एक चमचा ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
पोट गच्च झाल्यावर एक चमचा जिरेपूड गरम पाण्यात मिसळून प्यावे.
पोट गच्च झाले असल्यास अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
पोट गच्च झाल्यावर लिंबू रसात आल्याचा रस मिसळून प्यावे. हे घरगुती उपाय पोट गच्च झाल्यानंतर करावे.
पोट गच्च होऊ नये यासाठी काय करावे..?
- एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे.
- घाई गडबडीने जेवणे टाळावे.
- तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाणे टाळावे.
- पचनास जड असणारे पदार्थ खाणे कमी करा.
- वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा.
- अल्कोहोल, स्मोकींग अशी व्यसने टाळा.
- पोटाभोवती जास्त आवळून बेल्ट बांधू नका.
- जेवणानंतर लगेच झोपणे टाळा.
- नियमित व्यायाम करा.
अशी काळजी घ्यावी.
हे सुध्दा वाचा – पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Stomach feels full Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.